PM Kisan Sampada Yojana 2024:तब्बल 4600 कोटी रुपयांची तरतूद! प्रधानमंत्री किसान संपदा योजना 2024|

Table of Contents

PM Kisan Sampada Yojana In Marathi 2024

PM Kisan Sampada Yojana 2024: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आजच्या या लेखात PM Kisan Sampada Yojana 2024 (प्रधानमंत्री किसान संपदा योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जसे की, नक्की काय आहे ही योजना? ही योजना कोणी सुरू केली? काय आहेत या योजनेचे मुख्य उद्देश? या योजनेची वैशिष्ट्ये काय काय आहेत? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकणार आहे? या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहेत? या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत. तुम्हाला जर या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवायचा असेल तर खालील संपूर्ण लेख काळजीपूर्वक वाचा.

आपल्या राज्यातील अन्न प्रक्रियेच्या प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने अलीकडच्या काळात “प्रधानमंत्री किसान संपदा योजना” सुरू केली आहे. मित्रांनो, आपला भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. केंद्र व राज्य सरकार आपल्या देशातील तसेच राज्यातील कृषि क्षेत्राला चालना देण्यासाठी सतत नवनवीन योजना राबवत असते. त्याचबरोबर सतत नवनवीन उपक्रम राबवण्याचे काम देखील करत असते. या योजनांच्या माध्यमातून देशातील तसेच राज्यातील कृषि क्षेत्राला अनेक प्रकारची आर्थिक मदत केली जाते.

आपल्या देशातील 20 लाखाहून अधिक शेतकरी बांधवांना PM Kisan Sampada Yojana 2024 (प्रधानमंत्री किसान संपदा योजना 2024) च्या माध्यमातून लाभ दिला जाणार आहे. त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करून दिल्या जातात, त्यामुळे शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना चांगला परतावा देखील या योजनेमुळे मिळणार आहे. नक्कीच या योजनेच्या माध्यमातून आपल्या राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होणार आहे.

pm kisan yojana 2024 1

प्रधानमंत्री किसान संपदा योजना 2024 नक्की काय आहे?

PM Kisan Sampada Yojana 2024 (प्रधानमंत्री किसान संपदा योजना 2024) ही केंद्र सरकारने अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय विभागामार्फत सुरू केलेली अत्यंत महत्वाची अशी योजना आहे. या योजनेद्वारे अन्न प्रक्रिया आणि कृषी-सागरी प्रक्रियेसाठी क्लस्टर तयार केले जातात. या योजनेच्या माध्यमातून आपल्या देशातील शेतकरी बांधवांना मोठ्याप्रमाणात फायदा होणार आहे. तसेच या योजनेमुळे देशातील अन्न प्रक्रिया उद्योग वाढणार आहे आणि यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील वाढ होणार आहे.

महत्वाचं म्हणजे प्रधानमंत्री किसान संपदा योजनेच्या माध्यमातून आपल्या देशाच्या ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणात रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होणार आहेत. मित्रांनो, केंद्र सरकारने PM Kisan Sampada Yojana 2024 (प्रधानमंत्री किसान संपदा योजना 2024) साठी 31/3/2026 पर्यंत 4600 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याचबरोबर 2025-26 पर्यंत या योजनेच्या माध्यमातून 11,095.93 कोटी रुपये गुंतवणुकीची अपेक्षा आहे. प्रधानमंत्री किसान संपदा योजनेचा फायदा 28 लाख 49 हजार 945 शेतकऱ्यांना झाला आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या योजनेच्या माध्यमातून आपल्या देशात 5 लाख 44 हजार 432 रोजगार निर्माण झाले आहेत.

PM Kisan Sampada Yojana 2024 (प्रधानमंत्री किसान संपदा योजना 2024) च्या माध्यमातून आपल्या देशामध्ये पायाभूत सुविधा लॉजिस्टिक प्रकल्प अन्नप्रक्रिया युनिटची स्थापना करण्यासाठी गुंतवणूकदारांना प्रकल्प खर्चाच्या 35 ते 75 टक्के इतके अनुदान दिले जाते. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार आपल्या देशातील शेतकरी बांधवांना त्यांच्या मालाची योग्य विक्री करण्यासाठी व्यवस्थापन देते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य भाव मिळतो. फार्म गेट ते आउटलेट पर्यंत कार्यक्षम पुरवठा साखळी व्यवस्थापनासह आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करणे, हे प्रधानमंत्री किसान संपदा योजनेचे मुख्य उद्देश आहे.

PM Kisan Sampada Yojana 2024:थोडक्यात माहिती

योजनेचे नावPM Kisan Sampada Yojana 2024
(प्रधानमंत्री किसान संपदा योजना 2024)
योजना कोणी सुरू केलीकेंद्र सरकार
योजना कधी सुरू केलीऑगस्ट 2017
राज्यमहाराष्ट्र
विभागअन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय
योजनेचे मुख्य उद्देशफार्म गेट ते आउटलेट पर्यंत कार्यक्षम पुरवठा साखळी व्यवस्थापनासह आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करणे
योजनेचे लाभार्थीदेशातील शेतकरी
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभआपल्या देशातील अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना मिळणार आहे
अर्ज करण्याची प्रक्रियाऑफलाइन
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

PM Kisan Sampada Yojana 2024:राबविल्या जाणाऱ्या योजनांची यादी खालीलप्रमाणे

  1. मेगा फूड पार्क
  2. एकात्मिक गोल्ड चेन
  3. मूल्यवर्धन आणि संरक्षण पायाभूत सुविधा
  4. अन्नप्रक्रिया संरक्षण क्षमतेची निर्मिती आणि विस्तार
  5. कृषी प्रक्रिया क्लस्टरसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे
  6. बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेच्या निर्मितीसाठी योजना
  7. अन्नसुरक्षा आणि गुणवत्ता हमी
  8. पायाभूत सुविधा निर्माण करणे
  9. मानवी संसाधने आणि संस्था
PM Kisan Sampada Yojana 2024

PM Kisan Sampada Yojana 2024:योजनेचे मुख्य उद्देश

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री किसान संपदा योजना 2024” चे मुख्य उद्देश काय काय आहेत?

  • प्रधानमंत्री किसान संपदा योजनेचे मुख्य उद्देश म्हणजे फार्म गेट ते आउटलेट पर्यंत कार्यक्षम पुरवठा साखळी व्यवस्थापनासह आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करणे.
  • PM Kisan Sampada Yojana 2024 (प्रधानमंत्री किसान संपदा योजना 2024) च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव दिला जातो.
  • पिकाला योग्य भाव मिळाल्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होते, यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होतो.
  • या योजनेच्या माध्यमातून देशातील ग्रामीण भागात नवनवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
  • मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीद्वारे ही योजना काम करते.

PM Kisan Sampada Yojana 2024:योजनेची वैशिष्ट्ये

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री किसान संपदा योजना 2024” ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?

  • अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय विभागामार्फत केंद्र शासनाने PM Kisan Sampada Yojana 2024 (प्रधानमंत्री किसान संपदा योजना 2024) सुरू केली आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून अन्नप्रक्रिया आणि कृषी-सागरी प्रक्रियेसाठी क्लस्टर तयार केले जातात.
  • प्रधानमंत्री किसान संपदा योजनेच्या माध्यमातून देशातील अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना मिळणार आहे.
  • त्यामुळे आपल्या देशातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचा आर्थिक विकास या योजनेच्या माध्यमातून होणार आहे.
  • प्रधानमंत्री किसान संपदा योजना 2024 अंतर्गत 2020 मध्ये 32 नवीन प्रकल्प सुरू करण्यात आले, त्यासाठी केंद्र सरकारने 406 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.
  • आणि महत्वाचं म्हणजे या योजनेमुळे आपल्या देशातील अन्न प्रक्रिया उद्योग वाढेल आणि आपल्या शेतकरी बांधवांना मोठ्याप्रमाणात नफा होईल.

PM Kisan Sampada Yojana 2024:योजनेचे फायदे

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री किसान संपदा योजना 2024” चे फायदे काय काय आहेत?

  • सदर योजनेमुळे शेतकरी बांधवांनी पिकवलेले धान्य वाया जाणार नाही.
  • शेतकऱ्यांना आपल्या पिकवलेल्या पिकाचा योग्य भाव दिला जाईल.
  • या योजनेच्या माध्यमातून देशातील ग्रामीण भागात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रकारचे रोजगार उपलब्ध होणार आहेत.
  • शेतकरी बांधवांना या योजनेच्या माध्यमातून आधुनिक तसेच नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करता येईल.
  • प्रधानमंत्री किसान संपदा योजना 2024 च्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास होण्यास मदत होईल.

PM Kisan Sampada Yojana 2024:पात्रता, अटी व शर्ती

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री किसान संपदा योजना 2024” साठी काय काय पात्रता आवश्यक आहे? काय काय अटी व शर्ती काय आहेत?

  • प्रधानमंत्री किसान संपदा योजना 2024 चा लाभ घेऊ इच्छिणारा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • सदर योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
  • त्याचबरोबर अर्जदाराकडे शेती असणे आवश्यक आहे. तसेच शेती करण्याचा अनुभव असणे गरजेचे आहे.
  • महत्वाचं म्हणजे अर्जदार शेतकऱ्याचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे.

PM Kisan Sampada Yojana 2024: आवश्यक कागदपत्रे

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री किसान संपदा योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहेत?

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • रेशनकार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • जातीचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • जन्म प्रमाणपत्र
  • जमिनीचे कागदपत्रे
  • बँक खात्याचा तपशील
  • पासपोर्ट साईज आकाराचे फोटो

PM Kisan Sampada Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “प्रधानमंत्री किसान संपदा योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?

● ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

  • PM Kisan Sampada Yojana 2024 (प्रधानमंत्री किसान संपदा योजना 2024) चा अर्ज करण्यासाठी अर्जदारास सर्व प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
PM Kisan Sampada Yojana 2024
  • अधिकृत वेबसाइट उघडल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल, त्यामध्ये तुम्हाला ‘रजिस्ट्रेशन’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन ‘एप्लीकेशन फॉर्म’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • आता तुमच्यासमोर एक नवीन अर्ज उघडेल, त्या अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरायची आहे.
  • संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला आवश्यक असणारी सरबव कागदपत्रे आपल्या अर्जासोबत अपलोड करायची आहेत.
  • आणि अर्ज पुन्हा एकदा तपासून घ्यायचा आहे, आपण भरलेली माहिती अचूक आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे.
  • संपूर्ण माहिती अचूक असल्यास तुम्हाला आता ‘सबमीट’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल वर एसएमएस येईल म्हणजेच तुमचे एप्लीकेशन सक्सेसफुल झाले.
  • अशा प्रकारे मित्रांनो, PM Kisan Sampada Yojana 2024 (प्रधानमंत्री किसान संपदा योजना 2024) ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हालाप्रधानमंत्री किसान संपदा योजना 2024 ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 मोफत शिलाई मशीन योजना 2024
मोदी आवास घरकुल योजना 2024बीज भांडवल योजना 2024
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024गाय गोठा अनुदान योजना 2024
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४डिझेल पंप सबसिडी योजना 2024
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४ इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2024
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024
इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना 2024श्रावण बाळ योजना 2024
जिव्हाळा कर्ज योजना 2024ताडपत्री अनुदान योजना 2024
सामूहिक विवाह योजना महाराष्ट्र 2024खावटी अनुदान योजना 2024
कुक्कुट पालन कर्ज योजना 2024नवीन स्वर्णिमा योजना 2024
नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना 2024मल्चिंग पेपर योजना 2024
PM Kisan Sampada Yojana 2024:FAQ’s
PM Kisan Sampada Yojana 2024 (प्रधानमंत्री किसान संपदा योजना 2024) कोणी आणि कधी सुरू केली?

ऑगस्ट 2017 मध्ये अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय विभागामार्फत केंद्र शासनाने PM Kisan Sampada Yojana 2024 (प्रधानमंत्री किसान संपदा योजना 2024) सुरू केली आहे.

PM Kisan Sampada Yojana 2024 (प्रधानमंत्री किसान संपदा योजना 2024) चे उद्देश काय आहे?

फार्म गेट ते आउटलेट पर्यंत कार्यक्षम पुरवठा साखळी व्यवस्थापनासह आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.

PM Kisan Sampada Yojana 2024 (प्रधानमंत्री किसान संपदा योजना 2024) च्या माध्यमातून काय लाभ मिळणार आहे?

या योजनेच्या माध्यमातून आपल्या देशातील अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना मिळणार आहे

PM Kisan Sampada Yojana 2024 (प्रधानमंत्री किसान संपदा योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?

सदर योजनेचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.