PM Kisan Yojana In Marathi 2025
PM Kisan Yojana 2025: नमस्कार शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आता एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ घेता येणार आहे. त्याचबरोबर नवीन शेत विकत घेणाऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान योजना आता बंद राहणार आहे. लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्याला नवीन 7/12 आणि 8 ‘अ’ उतारा अनिवार्य राहणार आहे.
देशभरातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ आता एका कुटुंबातील पती-पत्नी यापैकी एका व्यक्तीला किंवा 18 वर्षे वी पूर्ण असलेल्या त्यांच्या मुलांना घेता येणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ हा वारसा हक्कानेच मिळणार आहे.
PM Kisan Yojana 2025 शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी सातत्याने नवनवीन योजना राबवत असते. त्यातीलच एक महत्वाची अशी योजना म्हणजेच “प्रधानमंत्री किसान योजना’ होय. केंद्र सरकारने पीएम किसान योजनेची सुरुवात 2019 मध्ये केली होती. पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन समान हप्त्यामध्ये एकूण 6 हजार रुपये दिले जातात.
PM Kisan Yojana 2025 प्रधानमंत्री किसान योजनेच्या माध्यमातून कुटुंबातील पती-पत्नी यापैकी एकाची 2019 पूर्वी जमीन नोंद असेल तर लाभ घेता येतो. परंतु 2019 नंतर नवीन जमीन शेतकऱ्यांच्या नावावर आलेले तसेच माहेरकडील जमीन नावावर आहे म्हणून अर्ज केला असला तरी पती लाभ घेता असेल तर पत्नीला हा लाभ घेता येणार नाही. त्याचबरोबर लाभधारक शेतकऱ्यांचे निधन झाले असेल तर त्यानंतर त्यांच्या वारसाची वारस हक्क नोंद झाली असले तरच त्याच्या वारसाला या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळू शकतो.
PM Kisan Yojana 2025 नोंदणीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे
- जमिनीचा 7/12 व 8 ‘अ’ उतारा
- पती-पत्नी व 18 वर्षातील अपत्यांचे आधार कार्ड
- अर्जदाराच्या नावे जमीन असल्यास फेरफार
- वारस हक्काने खातेदार झाल्यास मयत व्यक्तीच्या नावे 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीच्या जमीन धारण असल्याचा फेरफार
- कृषी सहायक यांचे भौतिक तपासणी प्रमाणपत्र
- रेशन कार्ड
PM Kisan Yojana 2025 नोकरदार आणि करदात्यांसाठी योजना बंद
● PM Kisan Yojana 2025 (पीएम किसान योजना) आता सरकारी व निमसरकारी नोकरी असलेल्या किंवा करदाता असलेल्या शेतकऱ्यांसाठी हि योजना बंद होणार आहे. यांना आता पीएम किसान योजनेच्या माध्यमातून लाभ घेता येणार नाही. यावरून आता फक्त शेतीवरच अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.
सारांश
मित्रांनो, आम्ही तुम्हाला “PM Kisan Yojana 2025 (पीएम किसान योजना)“ ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.
धन्यवाद !!
इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️