Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Project 2.0 (Pocra 2.0):पोकरा योजना 2.0 ऑनलाइन अर्ज सुरू, संपूर्ण माहिती|

Pocra Yojana 2.0 In Marathi 2025

Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Project 2.0 (Pocra 2.0): नमस्कार मित्रांनो, नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना प्रकल्प 2.0 ची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखात पाहणार आहोत. आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना पाण्याच्या टंचाईने पीक लागवडीसाठी येणाऱ्या समस्या, तसेच हवामानातील अचानक होणाऱ्या बदलांमुळे शेतकरी राज्याला येणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांच्या अशा सर्व समस्यांचा काळजीपूर्वक विचार करून महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील दुष्काळग्रस्त भाग हा दुष्काळमुक्त व्हावा, त्याचबरोबर त्या ठिकाणी पिकाच्या लागवडीवर भर देण्यात यावा यासाठी सुरू करण्यात आलेली Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana ही अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.

मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना हवामान बदलांशी जुळवून घेण्यासाठी त्याचबरोबर शेती व्यवसाय किफायतशीर करण्यासाठी सुरू करण्यात आलेली Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Project 2.0 (Pocra 2.0) नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प 2.0 (पोकरा 2.0) ही अतिशय महत्वाची योजना आहे.

Pocra 2.0 (पोकरा 2.0) हा या योजनेचा दूसरा टप्पा आहे. यामध्ये प्रामुख्याने शेतीची उत्पादकता वाढविणे, पाण्याचा कार्यक्षम वापर त्याचबरोबर शेतीमध्ये टिकाऊ तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे आणि महत्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांना स्वावलंबी बनविणे असे उद्देश आहे.

नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना

Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Project 2.0 (Pocra 2.0)

Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Project 2.0 (Pocra 2.0) समाविष्ट जिल्हे खालीलप्रमाणे

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प 2.0 (पोकरा 2.0)” मध्ये कोणते कोणते जिल्हे समाविष्ट आहेत?

Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Project 2.0 (Pocra 2.0) शेतकरी बांधवांनो नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प 2.0 (पोकरा 2.0) अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील एकूण 21 जिल्ह्यांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भ त्याचबरोबर खानदेशातील जिल्ह्यांचा समावेश आहे. चला पाहूया,

मराठवाडा

  • छत्रपती संभाजीनगर
  • बीड
  • परभणी
  • जालना
  • हिंगोली
  • लातूर
  • नांदेड
  • धारशिव

विदर्भ

  • गडचिरोली
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • यवतमाळ
  • बुलढाणा
  • अकोला
  • वाशिम
  • भंडारा
  • वर्धा
  • अमरावती
  • गोंदिया

खानदेश

  • जळगाव
  • नाशिक

Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Project 2.0 (Pocra 2.0) अर्ज कसा करायचा?

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प 2.0 (पोकरा 2.0)” साठी अर्ज कसा करायचा?

● ऑनलाइन अर्ज प्रक्रिया :-

  • Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Project 2.0 (Pocra 2.0) नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प 2.0 (पोकरा 2.0) चा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइट ला भेट द्यावी लागणार आहे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर होमपेज ओपन होईल, त्यामध्ये तुम्हाला NDKSP DBT म्हणजेच नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प डीबीटी) असा टॅब दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.
Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Project 2.0 (Pocra 2.0)
  • मित्रांनो, “NDKSP DBT” या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर दोन पर्याय दिसतील
    • शेतकरी लॉगिन
    • कृषि व्यवसाय लॉगिन
  • यामध्ये तुम्हाला “शेतकरी लॉगिन” हा पर्याय निवडायचा आहे.
Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Project 2.0 (Pocra 2.0)
  • आता मित्रांनो, लॉगिन करण्यासाठी तुम्हाला Agristack Farmer ID किंवा तुमचा आधार नंबर वापरावा लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला त्याच्याच खाली दिलेल्या “सत्यापित करा” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर लगेचच तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल.
  • OTP भरून तुम्ही लॉगिन करू शकताय.
  • वरील प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर तुमची सर्व माहिती जसे की तुमचे नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल नंबर ई. माहिती दिसेल.
  • मित्रांनो, आता तुम्हाला तुमची प्रोफाइल अपडेट करावी लागेल, त्यासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती तुम्हाला त्यामध्ये सविस्तर भरावी लागणार आहे.
  • तसेच तुमचा पत्ता म्हणजेच गाव, जिल्हा, तालुका, राज्य आणि पिनकोड इ माहिती भरावी लागणार आहे.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या शेतीविषयी माहिती भरावी लागेल. संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • आता तुमच्यासमोर “नवीन बाबींसाठी अर्ज करा” हा पर्याय दिसेल, तुम्हाला त्यावर क्लिक करायचे आहे.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर विविध घटक दिसतील, त्यामध्ये
    • कृषि वाणिकीकरण (वृक्ष लागवड, बांबू लागवड)
    • फळबाग लागवड
    • सूक्ष्म सिंचन (ठिबक, तुषार)
    • वैयक्तिक शेततळ
    • विहीर पुनर्भरण ई.
  • मित्रांनो, आता तुम्हाला प्रत्येक घटकासाठी पात्रता निकष आणि आवश्यक असणारी कागदपत्रे दाखवली जातात. यामध्ये तुम्ही जर पात्र असाल तर पुढे जाऊ शकताय.
  • शेवटी तुम्हाला अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे.
  • ते झाल्यानंतर तुम्ही “स्वयंघोषणा” या पर्यायावर क्लिक करू शकताय आणि तुमचा भरलेला अर्ज “सबमिट” या पर्यायावर क्लिक करून सबमिट करू शकताय.
  • आता महत्वाचं म्हणजे तुमचा अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्याची प्रिंट किंवा पीडीएफ (PDF) डाउनलोड करता येईल.

Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Project 2.0 (Pocra 2.0) महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज सुरू :- 28 ऑक्टोबर 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- लवकरच जाहीर होईल

जिल्ह्यानुसार पडताळणी :- प्रक्रिया सुरू आहे

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हालाNanaji Deshmukh Krishi Sanjivani Project 2.0 (Pocra 2.0) नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प 2.0 (पोकरा 2.0) ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 मोफत शिलाई मशीन योजना 2024
मोदी आवास घरकुल योजना 2024बीज भांडवल योजना 2024
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024गाय गोठा अनुदान योजना 2024
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४डिझेल पंप सबसिडी योजना 2024
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४ इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2024
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024
इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना 2024श्रावण बाळ योजना 2024
जिव्हाळा कर्ज योजना 2024ताडपत्री अनुदान योजना 2024
किशोरी शक्ती योजना 2024विलासराव देशमुख अभय योजना 2024
नवीन स्वर्णिमा योजना 2024बांधकाम कामगार योजना 2024
मल्चिंग पेपर योजना 2024अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024