Antarjatiya Vivah Yojana 2024: आंतरजातीय विवाह केल्यास मिळणार 3 लाख रुपये!!

Inter Caste Marriage Scheme In Marathi 2024

Antarjatiya Vivah Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात Inter Caste Marriage Scheme म्हणजेच आंतरजातीय विवाह योजना 2024 ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. ही योजना नक्की काय आहे? कोण कोण या योजनेसाठी अर्ज करू शकतो? या योजनेचा कोणाला फायदा होणार आहे? या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा आहे? त्याचबरोबर या योजनेची मुख्य उद्देश, मुख्य वैशिष्ट्ये काय काय आहेत? ई सर्व माहिती आपण पाहणार आहोत. मित्रांनो, कृपया खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.

मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. जेणेकरून राज्यातील नागरिकांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास व्हावा, तसेच राज्यातील सर्व जाती-धर्माचे लोक एकत्रित रहावे. त्यातीलच एक योजना म्हणजे “आंतरजातीय विवाह योजना 2024” होय. मित्रांनो, आपल्या देशात तसेच राज्यात अनेक प्रकारच्या जाती-धर्माचे लोक राहतात. त्यामुळे राज्यात मोठ्याप्रमाणात आपल्याला जातीभेद, तसेच इतर भेदभाव पाहायला मिळतात. महत्वाचं म्हणजे आपल्या समाजातील ही चालू असणारी अस्पृश्यता नष्ट करण्याच्या मुख्य उद्देशाने आपल्या महाराष्ट्र सरकारने “आंतरजातीय विवाह योजना 2024” सुरू केली आहे.

आज देखील मित्रांनो आपण आपल्या आजूबाजूला म्हणजेच आपल्या समाजात पाहतोय की समाजामध्ये आज देखी अशी समज आहे की इतर दुसऱ्या जाती-धर्माच्या मुलाशी किंवा मुलीशी म्हणजेच आंतरजातीय विवाह केल्यामुळे अडचणी येतात. मित्रांनो, आपल्या देशातील इतर राज्य त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात आज देखील काही समाजकंटक जाती-धर्मावर भेदभाव करतात. त्याचप्रमाणे जात-धर्म या नावाखाली आपापसात वाद निर्माण करतात, आपल्या समाजामध्ये दंगली घडवून आणतात. या सर्व गोष्टी नष्ट करण्याच्या उद्देशाने आपले महाराष्ट्र सरकार सतत प्रयत्नशील असते. या सर्व चुकीच्या गोष्टींना आळा बसावा, या गोष्टी कुठेतरी थांबायला हव्या आणि आपल्या समाजामध्ये आंतरजातीय विवाह करण्यासाठी कुठल्याही प्रकारे अडचणी येऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून “आंतरजातीय विवाह योजना 2024” सुरू करण्यात आली आहे.

या योजनेच्या माध्यमातून आंतरजातीय विवाह करणाऱ्या विवाहित जोडप्याला 50 हजार रुपयांची आर्थिक रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यात येते. तसेच या योजेनच्या अंतर्गत आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यापैकी एक जण म्हणजेच मुलगी किंवा मुलगा अनुसूचित जाती प्रवर्गातील (SC) व दलित समाजातील असल्यास त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या माध्यमातून 2.50 लाख रुपये देण्यात येतात. अशाप्रकारे आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यास एकूण 3 लाख रुपये रक्कम मिळते. यामध्ये केंद्र आणि राज्यसरकारचा वाटा 50-50 टक्के आहे.

आंतरजातीय विवाह योजना 2024 च्या माध्यमातून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला महाराष्ट्र शासनाचा एक आधार मिळणार आहे. त्यांना त्यांचे भविष्य घडवण्यासाठी त्याचबरोबर त्यांचा सुखाचा संसार थाटण्यासाठी आर्थिक मदत महाराष्ट्र शासनाद्वारे मिळणार आहे. आंतरजातीय विवाह योजना 2024 मुळे आंतरजातीय विवाह केल्यास विवाहित जोडप्याला कोणत्याही प्रकारे अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. तसेच आपल्या समाजातील जातीभेद देखील नष्ट होईल.

Antarjatiya Vivah Yojana 2024

Antarjatiya Vivah Yojana 2024: थोडक्यात माहिती

योजनेचे नावAntarjatiya Vivah Yojana 2024(आंतरजातीय विवाह योजना 2024)
योजना कोणी सुरू केलीराज्य सरकार
योजना कधी सुरू केली3 सप्टेंबर 1959
विभागसमाज कल्याण विभाग
राज्यमहाराष्ट्र
लाभआंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यास आर्थिक मदत करणे
योजनेच्या माध्यमातून लाभ किती मिळणार3 लाख रुपये
योजनेसाठी अर्ज कसा करावाऑनलाइन/ ऑफलाइन `
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

Antarjatiya Vivah Yojana 2024: योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये

मित्रांनो, Antarjatiya Vivah Yojana 2024(आंतरजातीय विवाह योजना 2024) योजेनचे मुख्य वैशिष्ट्ये काय आहे?, जाणून घेऊया;

  • आंतरजातीय विवाह योजना 2024 ची सुरुवात महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे केली आहे.
  • आपल्या राज्यातील जातीधर्मातील वाद-विवाद, दंगली अशाप्रकारच्या घटना घडू नये, त्याचबरोबर समाजात समानता राहावी यासाठी “आंतरजातीय विवाह योजना 2024” ची सुरुवात करण्यात आली आहे.
  • समाजातील जाती जातीमधील वाद तसेच भेदभाव नष्ट करण्याच्या हेतूने ही योजना अमलात आणली गेली आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून आंतरजातीय विवाह करणाऱ्या विवाहित जोडप्याला 50 हजार रुपयांची आर्थिक रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यात येते.
  • तसेच या योजेनच्या अंतर्गत आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यापैकी एक जण म्हणजेच मुलगी किंवा मुलगा अनुसूचित जाती प्रवर्गातील (SC) व दलित समाजातील असल्यास त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या माध्यमातून 2.50 लाख रुपये देण्यात येतात. अशाप्रकारे आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यास एकूण 3 लाख रुपये रक्कम मिळते. यामध्ये केंद्र आणि राज्यसरकारचा वाटा 50-50 टक्के आहे.
  • आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना आत्मनिर्भर, स्वावलंबी, सशक्त होण्यास या योजनेच्या माध्यमातून मदत मिळते.
  • विवाह झाल्यानंतर नवीन संसार सुरू करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आर्थिक स्वरूपात हातभार लागणार आहे.
  • मित्रांनो, आंतरजातीय विवाह योजना 2024 च्या माध्यमातून आर्थिक स्वरूपातील मिळणारी रक्कम ही थेट लाभार्थ्यांच्या खात्यात डि.बी.टी च्या सहाय्याने जमा करण्यात येते.
  • बौद्ध धर्मात धर्मांतर केलेल्या अनुसूचित जातीच्या व्यक्ती या सवलती मिळण्यास पात्र ठरणार आहेत.
  • आंतरजातीय विवाह करणाऱ्या सर्व जोडप्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. यासाठी असलेली आर्थिक उत्पन्नाची अट सरकारने रद्द केली आहे.
  • महत्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया अतीशय सोपी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला अर्ज करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.

Antarjatiya Vivah Yojana 2024: योजनेचे मुख्य उद्देश

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया Antarjatiya Vivah Yojana 2024 (आंतरजातीय विवाह योजना २०२४) चे मुख्य उद्देश काय काय आहेत?

  • आपल्या समाजातील जातीभेद नष्ट करणे.
  • समाजात सर्व धर्म समभाव निर्माण करणे हे या आंतरजातीय विवाह योजना २०२४ चे मुख्य उद्देश आहे.
  • आंतरजातीय विवाह योजना २०२४ च्या माध्यमातून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यास शासनाच्या माध्यमातून आधार देणे.
  • राज्यातील प्रत्येक जाती-धर्माला समान स्थान देण्याच्या उद्देशाने “आंतरजातीय विवाह योजना २०२४” सुरू करण्यात आली आहे.
  • आंतरजातीय विवाह योजना २०२४ च्या माध्यमातून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यास 3 लाख रुपये दिले जातात.
  • या योजनेच्या अंतर्गत राज्यातील जातीभेद कमी करणे तसेच अनुसूचित जाती, मागास वर्गातील तरुण तरुणींचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने ही योजना राबविली जात आहे.
  • जाती- जातीतील वाद कमी करून सर्व जाती धर्मातील लोक एकत्र राहावे यासाठी ही योजना कार्य करते.
  • जे तरुण आंतरजातीय विवाह करण्यासाठी इच्छुक आहेत परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती नाही, अशा विवाह करणाऱ्या जोडप्यांना ही योजना अतीशय फायदा देणारी आहे.

Antarjatiya Vivah Yojana 2024: पात्र व्यक्ती

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया Antarjatiya Vivah Yojana 2024 (आंतरजातीय विवाह योजना २०२४) साठी कोण कोण पात्र असणार आहे?

  • अनुसूचित जाती
  • अनुसूचित जमाती
  • विमुक्त जाती
  • भटक्या जमाती
  • विशेष मागासवर्गीय

Antarjatiya Vivah Yojana 2024:पात्रता

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया Antarjatiy Vivah Yojana 2024 (आंतरजातीय विवाह योजना २०२४) साठी काय काय पात्रता लागणार आहे?

  • आंतरजातीय विवाह करण्यासाठी अर्जदार व्यक्ती ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.

Antarjatiya Vivah Yojana 2024: योजनेचे नियम व अटी

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “आंतरजातीय विवाह योजना २०२४” साठी कोणते नियम व अटी आहेत?

  • या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवासी व्यक्ती घेऊ शकतात.
  • सदर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर विवाहित जोडप्यापैकी पती किंवा पत्नी ही अनुसूचित जाती (SC) प्रवर्गामधील असणे आवश्यक आहे.
  • आंतरजातीय विवाह योजना २०२४ अंतर्गत विवाह करणाऱ्या मुलाचे किंवा मुलीचे वय ही शासनाच्या दिलेल्या नियमाप्रमाणे म्हणजेच मुलाचे 21 वर्षे तसेच मुलीचे 18 वर्षे वय पूर्ण असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार व्यक्तीने या आधी आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • विवाह झाल्यानंतर 3 वर्षाच्या आत या योजनेसाठी अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर अर्ज केल्यास तुमच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची नोंद घ्यावी.
  • आंतरजातीय विवाह हा कोर्ट मॅरेज असेल तरच या योजेनेसाठी तुम्ही अर्ज करू शकताय.
  • अर्जदाराचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.

Antarjatiya Vivah Yojana 2024: आवश्यक कागदपत्रे

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया Antarjatiya Vivah Yojana 2024(आंतरजातीय विवाह योजना २०२४) चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

  • विवाह नोंदणी दाखला (Married Certificate)
  • आधार कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • कोर्ट मॅरेज प्रमाणपत्र
  • मोबईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • पती व पत्नीचे पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
  • तरुण – तरुणीचे जातीचे प्रमाणपत्र
  • दोन प्रतिष्ठित व्यक्तींचे शिफारस पत्र
  • पॅन कार्ड
  • लाभार्थी वधू -वराचा शाळा सोडल्याचा दाखला
  • राष्ट्रीयकृत बँक खात्याचे पासबुक
  • वधू वराचे एकत्रित बँक खाते
  • रहिवासी दाखला
  • लग्नाचा फोटो

Antarjatiya Vivah Yojana 2024: अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया Antarjatiya Vivah Yojana 2024(आंतरजातीय विवाह योजना २०२४) चा अर्ज कसा करायचा आहे?

● ऑनलाइन अर्ज पद्धत :-

  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सर्वात आधी सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर तुमच्या समोर होमपेज उघडेल.
  • त्यावर आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना या पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर योजनेचा अर्ज उघडेल.
  • अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित आणि अचूक पद्धतीने भरा.
  • माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
  • कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुमचं अर्ज एकदा तपासून पाहणे आवश्यक आहे, सर्व माहिती अचूक आहे की नाही याची खात्री करणे गरजेचे आहे.
  • अर्ज तपासून झाल्यानंतर सेव बटणावर क्लिक करून तुम्ही तुमचं अर्ज सबमिट करू शकताय.
  • अशा पद्धतीने “आंतरजातीय विवाह योजना २०२४” ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

● ऑफलाइन अर्ज पद्धत :-

  • अर्जदाराला सर्वप्रथम आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात जाऊन आंतरजातीय विवाह योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्ज घेतल्यानंतर त्यात विचारलेली सर्व माहिती अचूक पद्धतीने भरावी.
  • माहिती भरून झाल्यानंतर त्यासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  • कागदपत्रे जोडल्यानंतर अर्ज तपासून पाहणे गरजेचे आहे.
  • संपूर्ण माहिती तपासून झाल्यानंतर अर्ज जमा करावा लागेल.
  • अशा पद्धतीने “आंतरजातीय विवाह योजना २०२४” ची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

Antarjatiya Vivah Yojana 2024: महत्वाच्या लिंक्स

आंतरजातीय विवाह योजना २०२४ PDF ➡️येथे क्लिक करा⬅️
अधिकृत वेबसाइट ➡️येथे क्लिक करा⬅️

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “आंतरजातीय विवाह योजना २०२४” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४लेक लाडकी योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024गाय गोठा अनुदान योजना 2024
इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना 2024इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2024
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024जिव्हाळा कर्ज योजना 2024
वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना 2024
सामूहिक विवाह योजना महाराष्ट्र 2024स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना 2024
पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना 2024प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना 2024
मध केंद्र योजना 2024कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2024
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना 2024आयुष्मान भारत विमा योजना 2024
महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024प्रधानमंत्री आवास योजना 2024
शैक्षणिक कर्ज योजना 2024महिला सम्मान बचत प्रमाणपत्र योजना 2024

कृपया ही सरकारी योजनांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी योजनांचे मोफत अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

Antarjatiya Vivah Yojana 2024:FAQ’s
आंतरजातीय विवाह योजना २०२४ च्या माध्यमातून किती आर्थिक मदत मिळणार ?

3 लाख रुपये .

योजना कोणी सुरू केली आहे?

महाराष्ट्र सरकार

या योजनेसाठी कोण पात्र आहे?

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासवर्गीय व्यक्ती.

आंतरजातीय विवाह योजना २०२४ साठी अर्ज कसा करायचा आहे?

ऑनलाइन /ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.