Bandhkam Kamgar Yojana 2024:बांधकाम कामगारांना मिळणार 5 हजार रुपये!!

Table of Contents

Bandhkam Kamgar Yojana In Marathi 2024

Bandhkam Kamgar Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेल्या Bandhkam Kamgar Yojana 2024 (बांधकाम कामगार योजना 2024) ची सविस्तर माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत. जसे की ही योजना कोणी आणि कधी सुरू केली? ही योजना नक्की काय आहे? या योजनेचे मुख्य उदेश, वैशिष्ट्ये, पात्रता, अटी व शर्ती काय काय आहेत? या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकणार आहे? या योजनेचा अर्ज करताना अर्जदाराकडे कोणती कोणती कागदपत्रे लागणार आहेत? तसेच या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण सविस्तरपणे या लेखात पाहणार आहोत.

केंद्र आणि राज्य सरकारने आपल्या देशातील नागरिकांच्या उज्वल भविष्यासाठी त्याचबरोबर त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन योजना राबविल्या आहेत. जेणेकरून आपल्या देशातील नागरिक सशक्त व आत्मनिर्भर व्हावेत, नागरिकांचा आर्थिक आणि सामाजिक विकास व्हावा. अशातच महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांसाठी एक नवीन योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे, ती योजना म्हणजे Bandhkam Kamgar Yojana 2024 (बांधकाम कामगार योजना 2024) होय.

मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे कीआपल्या देशाच्या विकासात बांधकाम कामगारांचा खूप मोठा हात आहे. तसेच आपल्या महाराष्ट्र राज्यात देखील मोठ्याप्रमाणात बांधकाम कामगार काम करतात. बांधकाम कामगार हे अत्यंत कमी पगारात त्याचबरोबर ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता सतत काम करत असतात. कमी पगार असल्यामुळे त्यांना आपल्या व आपल्या कुटुंबांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांना आपल्या मुलांचे शिक्षण देखील पूर्ण करता येत नाही.

तसेच बांधकाम कामगार हे उंच मोठमोठ्या इमारतीमध्ये काम करत असल्यामुळे त्यांचे अनेकवेळा अपघात देखील होतात, आणि कमी पगार असल्याकारणाने त्यांना अपघातात झालेल्या दुखापतींचा औषधोपचार करण्यासाठी अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. काम करत असताना त्यांचा मृत्यू देखील होण्याची शक्यता असते, कुटुंबातील कर्ता पुरुष असा एकाएकी गेल्याने त्यांच्या कुटुंबाला पोट भरण्यासाठी विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा देखील पूर्ण करण्यासाठी अतोनात कष्ट करावे लागतात.

बांधकाम कामगारांच्या या सर्व समस्यांचा अत्यंत काळजीपूर्वक विचार करून महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत 1 मे 2011 रोजी Bandhkam Kamgar Yojana 2024 (बांधकाम कामगार योजना 2024) योजना सुरू करण्याचा अतीशय योग्य असा निर्णय घेतला आहे.

Bandhkam Kamgar Yojana 2024

बांधकाम कामगार योजना 2024 थोडक्यात माहिती

योजनेचे नावBandhkam Kamgar Yojana 2024
(बांधकाम कामगार योजना 2024)
योजना कोणी सुरू केलीमहाराष्ट्र राज्य सरकार
योजनेची सुरुवात कधी झाली1 मे 2011
राज्यमहाराष्ट्र राज्य
विभागमहाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळ
योजनेचे मुख्य उद्देश कायमहाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामागरांचा आर्थिक विकास करणे
योजनेचे लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगार
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभ5 हजार रुपये
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन/ऑफलाइन
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

Bandhkam Kamgar Yojana 2024 योजना नक्की काय आहे?

बांधकाम कामगार योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारच्या महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत सुरू करण्यात आलेली एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे. या योजनेची सुरुवात 1 मे 2011 रोजी करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांना विविध प्रकारच्या योजनांचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे नक्कीच या योजनेच्या माध्यमातून आपल्या राज्यातील बांधकाम क्षेत्रात काम करत असणाऱ्या कामगारांना मोठ्याप्रमाणात लाभ होणार आहे.

तसेच Bandhkam Kamgar Yojana 2024 (बांधकाम कामगार योजना 2024) च्या माध्यमातून आपल्या राज्यातील बांधकाम कामगारांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे. त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना आता कुठल्याही समस्यांना तोंड देण्याची गरज भासणार नाही. महत्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून कामगारांच्या कुटुंबाचा आर्थिक आणि सामाजिक विकास होणार आहे. त्याचबरोबर बांधकाम कामगार योजना 2024 अंतर्गत राज्यातील बांधकाम कामगारांना 2,000/- रुपये ते 5,000/- रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. या योजनेचे मुख्य उद्देश म्हणजे आपल्या राज्यातील कामगार बांधवांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे होय.

Bandhkam Kamgar Yojana 2024:योजनेचे मुख्य उद्देश

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “बांधकाम कामगार योजना 2024” चे मुख्य उद्देश काय काय आहेत?

  • महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य सरकारने Bandhkam Kamgar Yojana 2024 (बांधकाम कामगार योजना 2024) सुरू केली आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील बांधकाम कामगारांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणे.
  • त्याचबरोबर त्यांना सशक्त व आत्मनिर्भवर बनविणे.
  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील बांधकाम कामगारांचे जीवनमान सुधारणे.
  • राज्यातील बांधकाम कामगारांसाठी सरकारने सुरू केलेल्या सर्व योजनांची माहिती बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचवणे.
  • बांधकाम कामगार योजनेपासून कोणताही बांधकाम कामगार वंचित राहू नये, यासाठी प्रयत्नशील राहणे.
  • राज्यातील बांधकाम कामगारांना योजनेचा ऑनलाइन अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारच्या समस्या येऊ नये म्हणून अर्जाची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुलभ करणे.
  • Bandhkam Kamgar Yojana 2024 (बांधकाम कामगार योजना 2024) च्या माध्यमातून राज्यातील बांधकाम कामगारांचा सर्वांगीण विकास करणे.

Bandhkam Kamgar Yojana 2024:योजनेची वैशिष्ट्ये

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “बांधकाम कामगार योजना 2024” ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?

  • महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळ अंतर्गत सुरू करण्यात आलेली ही एक महत्वाची अशी योजना आहे.
  • या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सामान्य बांधकाम कामगारांच्या हिताचा विचार केला आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून कामगारांना आर्थिक सहाय्य दिले जाते.
  • त्याचबरोबर बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून कामगारांचा व त्यांच्या कुटुंबाच्या उज्वल भविष्यासाठी प्रयत्न केले जातात.
  • राज्यात रोजगाराच्या नवनवीन संधी वाढविण्याचे काम ही योजना करते.
  • या योजनेच्या माध्यमातून आपल्या राज्यातील बांधकाम कामगारांचा आर्थिक आणि सामाजिक विकास होण्यास मदत होणार आहे.
  • तसेच राज्यातील कामगारांना आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.
  • महत्वाचं म्हणजे बांधकाम कामगार योजनेच्या सहाय्याने राज्यातील इतर कामगार काम करण्यासाठी प्रोत्साहित होतील.
  • या योजनेच्या माध्यमातून कामगारांना 2,000/- ते 5,000/- रुपये आर्थिक सहाय्य केले जाते.
  • बांधकाम कामगार योजना 2024 च्या माध्यमातून मिळणारी लाभाची रक्कम ही लाभार्थी कामगाराच्या थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
  • शहरी भागातील उंच, मोठमोठ्या इमारतीमध्ये तसेच धोकादायक क्षेत्रांमध्ये बालकामगारांना काम करू दिले जात नाही.
  • Bandhkam Kamgar Yojana 2024 (बांधकाम कामगार योजना 2024) ची अर्ज प्रक्रिया अतीशय सोपी असल्यामुळे अर्जदारास अर्ज करताना कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागणार नाही.

Bandhkam Kamgar Yojana 2024: कामगारांची यादी

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “बांधकाम कामगार योजना 2024” साठी कामगारांची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे

  • रस्ते कामगार
  • इमारती
  • रेल्वे कामगार
  • एअरफील्ड
  • सिंचन
  • जलाशय
  • ट्रामवे
  • पाण्याचे तलाव
  • पाणी बाहेर काढणे
  • ब्रिज
  • बोगदे
  • दूरदर्शन
  • रेडिओ
  • टेलिफोन
  • धरण
  • कालवे
  • पुर नियंत्रणाची कामे
  • वीज पुरवठा केंद्रावरील कामे
  • पाण्याची कामे
  • जलवाहिनी
  • तेल आणि वायु प्रतिष्ठापन
  • पाईप लाईन
  • वायरलेस
  • टॉवर्स
  • वायरिंग
  • वॉटर कुलिंग टॉवर
  • दगड कापणे /तोडणे
  • अग्निशामक यंत्राची दुरुस्ती व स्थापना
  • लिफ्टची कामे
  • सुरक्षा दरवाजे
  • फरशी पॉलिश
  • गटार व प्लंम्बिंगची कामे
  • सोलार पॅनल
  • ट्रान्समिशन टॉवर
  • पेंट, वार्निश
  • सुतार काम
  • काचेचे पॅनल बसविणे/ काचा कापणे
  • POP (प्लास्टर ऑफ पॅरिस) ची कामे
  • लोखंडी किंवा धातूचे ग्रील्स तसेच दरवाजे /खिडक्या तयार करणे
  • विटा छप्पर
  • सार्वजनिक उद्याने तसेच पदपथ बांधकाम

Bandhkam Kamgar Yojana 2024:योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या वस्तू

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “बांधकाम कामगार योजना 2024” च्या माध्यमातून कोणत्या कोणत्या वस्तू मिळणार आहेत?

  • सेफ्टी शूज
  • बॅग
  • सोलर टॉर्च
  • सोलर चार्जर
  • जॅकेट
  • पाणी बॉटल
  • मच्छरदाणी
  • हात मोजे
  • चटई
  • हेल्मेट
  • जेवणाचा डब्बा ई.
Bandhkam Kamgar Yojana 2024

Bandhkam Kamgar Yojana 2024:पात्रता,अटी व शर्ती

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “बांधकाम कामगार योजना 2024” चा लाभ घेण्यासाठी काय काय पात्रता आवश्यक आहे? कोणत्या अटी व शर्ती आहेत?

  • सदर योजनेच्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणारा अर्जदार बांधकाम कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • आपल्या महाराष्ट्र राज्याच्या व्यतिरिक्त बाहेरील बांधकाम कामगारांना सदर योजनेचा अर्ज करता येणार नाही, तसेच त्यांना बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून कुठलाही लाभ दिला जाणार नाही.
  • त्याचबरोबर आपल्या राज्यातील बांधकाम कामगारांनी केंद्र व राज्य सरकाराद्वारे राबविण्यात आलेल्या इतर सरकारी योजनेच्या माध्यमातून लाभ मिळविला असल्यास संबंधित बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • Bandhkam Kamgar Yojana 2024 (बांधकाम कामगार योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी 18 ते 60 वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार नोंदणी करू शकतात.
  • महत्वाचं म्हणजे मागील 12 महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा अधिक काळ बांधकाम कामगार म्हणून काम केले असलेले कामगार या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

Bandhkam Kamgar Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “बांधकाम कामगार योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे?

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
  • अर्जदाराचा मोबाईल नंबर
  • रेशन कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • वयाचे प्रमाणपत्र
  • ओळखपत्र
  • आणि महत्वाचं म्हणजे 90 दिवस काम केले असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

Bandhkam Kamgar Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “बांधकाम कामगार योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?

● ऑनलाइन अर्ज पद्धत :-

  • सदर योजनेचा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्जदारास सर्वप्रथम महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार कल्याण मंडळ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.
Bandhkam Kamgar Yojana 2024
  • अधिकृत वेबसाइट उघडल्यानंतर तुमच्यासमोर होमपेज दिसेल.
  • होमपेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला तिथे ‘कामगार’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे, त्यानंतर ‘कामगार नोंदणी’ या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आता एक नवीन पेज ओपन होईल.
  • त्यामध्ये विचारलेली तुमच्या पात्रते संबंधित असणारी सर्व माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे.
  • सर्व माहिती भरल्यानंतर ‘तुमची पात्रता तपासा’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर एक नवीन नोंदणी अर्ज उघडेल.
  • आता तुम्हाला अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित काळजीपूर्वक भरायची आहे.
  • अर्जात संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आता तुम्हाला आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
  • त्यानंतर तुम्हाला ‘सबमीट’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • अशाप्रकारे मित्रांनो, तुमची “बांधकाम कामगार योजना 2024” ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हालाबांधकाम कामगार योजना 2024 ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 मोफत शिलाई मशीन योजना 2024
मोदी आवास घरकुल योजना 2024बीज भांडवल योजना 2024
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024गाय गोठा अनुदान योजना 2024
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४डिझेल पंप सबसिडी योजना 2024
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४ इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2024
खावटी अनुदान योजना 2024सामूहिक विवाह योजना महाराष्ट्र 2024
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024किशोरी शक्ती योजना 2024
प्रधानमंत्री किसान संपदा योजना 2024कुक्कुट पालन कर्ज योजना 2024
हर घर नल योजना 2024नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना 2024
मल्चिंग पेपर योजना 2024अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024
अपंग पेन्शन योजना 2024कन्या वन समृद्धी योजना 2024
आत्मनिर्भर भारत रोजगार योजना 2024बाल संगोपन योजना 2024
Bandhkam Kamgar Yojana 2024:FAQ’s
Bandhkam Kamgar Yojana 2024 (बांधकाम कामगार योजना 2024) कोणी आणि कधी सुरू केली आहे?

सदर योजना ही महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत 1 मे 2011 रोजी सुरू करण्यात आलेली योजना आहे.

Bandhkam Kamgar Yojana 2024 (बांधकाम कामगार योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?

महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामागरांचा आर्थिक विकास करणे हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.

Bandhkam Kamgar Yojana 2024 (बांधकाम कामगार योजना 2024) च्या माध्यमातून काय लाभ मिळणार आहे?

या योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना 2 हजार ते 5 हजार रुपये तसेच भांड्यांचा संच दिला जाणार आहे.

Bandhkam Kamgar Yojana 2024 (बांधकाम कामगार योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?

सदर योजनेचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.