Kasturba Gandhi Balika Vidyalaya Yojana In Marathi 2024
Kasturba Gandhi Balika Vidyalaya Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात Kasturba Gandhi Balika Vidyalaya Yojana 2024 (कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जसे की नक्की काय आहे ही योजना? ही योजना कोणी आणि कधी सुरू केली आहे? या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी कोण कोण पात्र ठरणार आहे? महत्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे? तसेच या योजनेचा अर्ज करताना कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे? त्याचबरोबर या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत.
केंद्र सरकार आपल्या देशातील नागरिकांच्या हितासाठी सतत नवनवीन योजना राबवत असते. त्याचबरोबर देशभरातील तरूणांसाठी, वृद्ध नागरिकांसाठी, महिलांसाठी, देशभरातील शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या देशातील विद्यार्थ्यांसाठी देखील केंद्र सरकार सातत्याने विविध योजना राबवत असते. अशातच केंद्र सरकारने देशभरातील SC, ST, OBC आणि अल्पसंख्याक तसेच दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील मुलींना चांगले उच्च प्राथमिक शिक्षण देण्याच्या उद्देशाने एक नवीन योजना सुरू केली आहे. ती म्हणजेच Kasturba Gandhi Balika Vidyalaya Yojana 2024 (कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2024) होय.
Kasturba Gandhi Balika Vidyalaya Yojana 2024 (कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2024) ही देशभरातील मागासवर्गीय भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून केंद्र सरकारने सुरू केलेली एक अतीशय महत्वाची अशी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने देशभरात एकूण 750 निवासी शाळा सुरू करण्याचे निश्चित केले आहे. शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या या शाळांमध्ये कमीत कमी 75 टक्के जागा अनुसूचित जाती जमाती, मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांक वर्गातील मुलींसाठी आरक्षित ठेवल्या जातात. त्याचप्रमाणे उर्वरित 25 टक्के जागा दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत असणाऱ्या कुटुंबातील मुलींसाठी असतात.
बेटी बचाव बेटी पढाव योजनेला सार्थक बनविण्याच्या उद्देशाने शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या कस्तुरबा गांधी बालिका निवासी शाळा मध्ये आता इयत्ता 12 वी पर्यंत शिक्षण दिले जाते. महत्वाचं म्हणजे Kasturba Gandhi Balika Vidyalaya Yojana 2024 (कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2024) ही देशभरातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबविण्यात आली आहे. आपल्या देशातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींना साक्षर बनविण्यासाठी त्याचबरोबर मुलींचे भविष्य उज्वल करण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून आपल्या देशातील मुलींचे ज्ञान व त्यांच्या साक्षरतेचा दर वाढविण्यास नक्कीच हातभार लागणार आहे.
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2024 थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | Kasturba Gandhi Balika Vidyalaya Yojana 2024 (कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2024) |
योजनेची सुरुवात कोणी केली | केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे |
योजनेची सुरुवात कधी करण्यात आली | ऑगस्ट 2004 |
राज्य | देशभरातील सर्व राज्य |
विभाग | शिक्षण मंत्रालय भारत सरकार |
योजनेचे मुख्य उद्देश | आपल्या देशातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींना साक्षर बनविणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे |
योजनेचे लाभार्थी | देशातील 14 वर्ष ते 18 वर्षे वयोगटातील मुली |
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभ | मोफत शिक्षण |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
Kasturba Gandhi Balika Vidyalaya Yojana 2024 नक्की काय आहे?
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाद्वारे देशभरातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींचे भविष्य उज्वल बनविण्याच्या उद्देशाने, तसेच देशातील मुलींना साक्षर बनविण्याच्या उद्देशाने ऑगस्ट 2004 मध्ये सुरू करण्यात आलेली Kasturba Gandhi Balika Vidyalaya Yojana 2024 (कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2024) ही एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.
Kasturba Gandhi Balika Vidyalaya Yojana 2024 (KGBV) ही प्रामुख्याने देशातील गरीब कुटुंबातील मुलींसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरात निवासी शाळा स्थापन केल्या आहेत. या शाळांमध्ये एससी, एसटी,ओबीसी, अल्पसंख्यांक वर्गातील मुलींना प्रवेश दिला जातो. तसेच ही योजना देशातील मागासवर्गातील विशेषतः अनुसूचित जाती जमाती व अन्य मागासवर्गातील मुलींना चांगले उच्च प्राथमिक शिक्षण मिळावे यासाठी सुरू करण्यात आलेली आहे.
शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या Kasturba Gandhi Balika Vidyalaya Yojana 2024 (कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2024) च्या माध्यमातून या निवासी शाळांमध्ये एसटी, एससी, ओबीसी व अल्पसंख्यांक मुलींना कमीत कमी 75 टक्के जागा आरक्षित ठेवल्या जातात. त्याचबरोबर उर्वरित 50 टक्के जागा देशभरातील गरीब कुटुंबातील आणि दारिद्र्यरेषेखालील मुलींना प्रवेश दिला जातो.
Kasturba Gandhi Balika Vidyalaya Yojana 2024:योजनेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सुविधा
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2024” च्या माध्यमातून काय काय सुविधा दिल्या जातात?
● शैक्षणिक सुविधा :-
- एका शाळेमध्ये 350 मुलींना प्रवेश दिल जातो.
- त्याचबरोबर मोफत गणवेश आणि पुस्तकांचे वाटप केले जाते.
- इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंतचे शिक्षण दिले जाते.
- तसेच सातत्याने मूल्यमापन करण्यात येते.
● पायाभूत सुविधा :-
- या योजनेच्या माध्यमातून मजबूत शाळेची इमारत बांधली जाते.
- त्याचबरोबर मूलभूत असणाऱ्या गरजा देखील पूर्ण केल्या जातात.
● शाळा व्यवस्थापन :-
- शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी
- शाळा व्यवस्थापन समिती
- शाळा खरेदी समिती
- शिक्षण पर्यावरण
- शाळेचे वातावरण
- शिक्षण संवर्धन प्रणाली समुदाय
- आणि नागरी समाजाकडून पाठिंबा गुणवत्ता निरीक्षण प्रणाली
● सह अभ्यासक्रम :-
- शिक्षणासोबतच अभ्यासक्रम खेळ आणि खेळणे तसेच आरोग्य तपासणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
Kasturba Gandhi Balika Vidyalaya Yojana 2024:पात्रता
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2024” साठी काय काय पात्रता आवश्यक आहे?
- देशातील ओबीसी, अनुसूचित जाती, मागासवर्गीय कुटुंबातील मुलींना “कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2024” च्या माध्यमातून माध्यमातून लाभ दिला जातो.
- अर्जदार मुलींचे वय 14 वर्ष ते 18 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
- त्याचबरोबर कमी महिला साक्षरता प्रमाण असलेल्या क्षेत्रात राहणाऱ्या मुली ज्यांना प्राथमिक शाळा पूर्ण करण्यासाठी असमर्थ आहेत, अशा मुलींना शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या निवासी शाळांमध्ये प्रवेश दिला जातो.
Kasturba Gandhi Balika Vidyalaya Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
- अर्जदार मुलींचा जातीचा दाखला
- बीपीएल प्रमाणपत्र
- प्राथमिक शाळेचे उत्तीर्ण प्रमाणपत्र
- जन्म प्रमाणपत्र
Kasturba Gandhi Balika Vidyalaya Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया
चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?
● ऑफलाइन अर्ज पद्धत :-
- Kasturba Gandhi Balika Vidyalaya Yojana 2024 (कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2024) च्या माध्यमातून लाभ मिळविण्यासाठी तसेच अर्ज करण्यासाठी अर्ज प्रक्रिया ही मे महिन्याच्या दरम्यान सुरू होते.
- त्यानंतर तुम्ही कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयामध्ये नोंदणी करू शकताय.
- तुमच्या जवळील परिसरातील शाळा शोधण्यासाठी तुम्ही शासनाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकताय.
सारांश
मित्रांनो, आम्ही तुम्हाला “कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.
धन्यवाद !!
इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️
Kasturba Gandhi Balika Vidyalaya Yojana 2024:FAQ’s
Kasturba Gandhi Balika Vidyalaya Yojana 2024 (कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2024) ची सुरुवात कोणी आणि कधी केली?
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2024 ची सुरुवात भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाद्वारे ऑगस्ट 2004 मध्ये करण्यात आली.
Kasturba Gandhi Balika Vidyalaya Yojana 2024 (कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?
आपल्या देशातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींना साक्षर बनविणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
Kasturba Gandhi Balika Vidyalaya Yojana 2024 (कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2024) चे लाभार्थी कोण आहेत?
देशातील 14 वर्ष ते 18 वर्षे वयोगटातील मुली या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यास पात्र आहेत.
Kasturba Gandhi Balika Vidyalaya Yojana 2024 (कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?
सदर योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.