Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024:नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना|

Table of Contents

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana In Marathi 2024

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या या लेखात आपण Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024 (नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना 2024) ची सविस्तर माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांच्या हितासाठी सुरू केलेली ही एक अतीशय महत्वाची योजना आहे. चला तर मग पाहूया काय आहे ही योजना? या योजनेचे मुख्य उद्देश काय आहे? काय आहेत या योजनेची वैशिष्ट्ये? आणि महत्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून कोण कोण लाभ मिळवू शकतो? कोण कोण पात्र ठरणार आहे? या योजनेचा अर्ज करतेवेळी कोणती कागदपत्रे लागणार आहेत? या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई सर्व माहिती आपण खालील लेखात जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र राज्य सरकार आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी म्हणजेच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी तसेच त्यांच्या उज्वल भविष्याचा विचार करून त्यांच्यासाठी नवनवीन योजना सातत्याने राबवत असते. शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जाणार आहे. महत्वाचं म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील 15 जिल्ह्यातील 5142 खेड्यांमध्ये राबविण्यात आली आहे.

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024 (नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना 2024) च्या माध्यमातून आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना पाण्याच्या टंचाईने पीक लागवडीसाठी येणाऱ्या अडचणी, त्याचबरोबर अचानक होणाऱ्या हवामानातील बदलांमुळे शेतकरी बांधवांना विविध समस्यांचा त्या ठिकाणी सामना करावा लागतो. मात्र या योजनेअंतर्गत आपल्या राज्यातील दुष्काळी भागातील शेतकरी बांधवांना पिकाची लागवड करण्यासाठी त्याचबरोबर हवामानातील बदलामुळे कोणत्याही समस्या येऊ नये तसेच दुष्काळग्रस्त भाग हा दुष्काळमुक्त व्हावा, त्या ठिकाणी पिकाच्या लागवडीवर भर देण्यात यावा असा काळजीपूर्वक विचार करून महाराष्ट्र राज्य सरकारच्या कृषी विभागाने Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024 (नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना 2024) सुरू करण्याचा अतीशय योग्य असा निर्णय घेतला आहे.

मित्रांनो, तुम्ही देखील या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी इच्छुक असाल तर खालील संपूर्ण लेख काळजीपूर्वक शेवटपर्यंत वाचा. तसेच संपूर्ण माहिती वाचल्यानंतर आपल्या नातेवाईकांना तसेच जवळील शेतकरी मित्रांना देखील शेअर करण्यास विसरू नका. जेणेकरून त्यांना देखील Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024 (नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना 2024) चा लाभ घेता येईल.

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024

नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना 2024 थोडक्यात माहिती

योजनेचे नावNanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024
(नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना 2024)
योजना कोणी सुरू केलीमहाराष्ट्र शासन
राज्यमहाराष्ट्र राज्य
विभागकृषी विभाग, महाराष्ट्र राज्य
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील शेतकरी
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभराज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024 नक्की काय आहे?

राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत सुरू करण्यात आलेली Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024 (नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना 2024) ही एक अतीशय महत्वाची अशी योजना आहे. ही योजना आपल्या महाराष्ट्र राज्यातील एकूण 15 जिल्ह्यातील 5142 खेडेगावांमध्ये सुरू करण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास घडवून आणण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात आली आहे.

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024 (नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना 2024) साठी 4 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्याच्या प्रस्तावाला मान्यत देण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील दुष्काळग्रस्त भाग हा पूर्णपणे दुष्काळमुक्त होण्यास मदत होणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील मातीचे परीक्षण केले जाईल, त्यानंतर त्यामध्ये काही कमतरता आढळून आल्यास त्यावर उपाययोजना करण्यात येणार आहे. परीक्षण केल्यानंतर त्यामध्ये शेती केली जाईल आणि जी शेत जमीन लागवडीसाठी अयोग्य ठरेल त्यामध्ये शेतीपूरक उद्योग व्यवसाय सुरू करण्यात येणार आहेत.

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024 (नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना 2024) च्या माध्यमातून नक्कीच आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना लाभ मिळेल. त्याचबरोबर त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचा आर्थिक विकास या योजनेच्या माध्यमातून होईल.

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024:योजनेचे मुख्य उद्देश

चला तर मग शेतकरी बांधवांनो, जाणून घेऊया “नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना 2024” चे मुख्य उद्देश काय काय आहेत?

  • आपल्या महाराष्ट्र राज्यातील दुष्काळी भागातील शेतजमीनीचे रूपांतर पूर्णतः शेती करण्यायोग्य सुपीक जमिनीमध्ये रूपांतर करणे हे Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024 (नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना 2024) चे मुख्य उद्देश आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील दुष्काळग्रस्त भाग हा दुष्काळमुक्त म्हणजेच शेती करण्यायोग्य होईल.
  • त्याचबरोबर राज्यातील शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात वाढ करणे हे देखील या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
  • दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास घडवून आणणे.
  • राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास हातभार लावणे.
  • महाराष्ट्र राज्यातील दुष्कळग्रस्त भागातील शेतीच्या मातीचे परीक्षण करणे, त्यावर योग्य त्या उपाययोजना करणे.
  • राज्यातील शेतकऱ्यांना शेतातील पिकाच्या सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करणे.
  • महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
  • राज्यातील इतर नागरिकांना शेती शेती व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करणे.

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024:योजनेअंतर्गत येणारे प्रकल्प

चला तर मग शेतकरी बांधवांनो, जाणून घेऊया “नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना 2024” अंतर्गत कोणते कोणते प्रकल्प राबविण्यात येणार आहेत?

  • बियाणे उत्पादन एकक
  • तलावाचे शेत
  • फार्म पोंडास अस्तर
  • शेळी पालन युनिट ऑपरेशन
  • लहान रवंथ करणारा प्रकल्प
  • वर्मी कंपोस्ट युनिट
  • सिंचन प्रकल्प शिंपडा
  • ठिबक सिंचन प्रकल्प
  • पाण्याचा पंप
  • फलोत्पादन अंतर्गत वृक्षारोपण प्रकल्प

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024:योजनेअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना खालीलप्रमाणे

चला तर मग शेतकरी बांधवांनो, जाणून घेऊया “नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना 2024” अंतर्गत कोणत्या कोणत्या योजना राबविल्या जाणार आहेत?

  • मधमाशी पालन योजना
  • फळबाग लागवड योजना
  • सेंद्रिय शेती विषयक योजना
  • शेततळे /सामुदायिक शेततळे योजना
  • पाणी उपसा सिंचन साधने तसेच पाईप योजना
  • नवीन विहीर /विहीर पुनर्भरण योजना
  • रेशीम योजना
  • पिकासाठी ठिबक त्याचबरोबर तुषार सिंचन योजना
  • बंदिस्त शेळीपाळण योजना
  • परिसरातील कुक्कुटपालन योजना
  • भाडेतत्वावर कृषी अवजारे/ यंत्रांची निर्मिती योजना

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024:योजनेअंतर्गत गाव निवडीचे निकष

चला तर मग शेतकरी बांधवांनो, जाणून घेऊया “नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना 2024” अंतर्गत गावाची निवड कशाप्रकारे केली जाते?

  • हवामान विषयक अनुमान
  • निवड पेरणी क्षेत्राचे एकूण भौगोलिक क्षेत्राचे प्रमाण
  • विना लागवड योग्य जमिनीची एकूण क्षेत्राचे प्रमाण
  • दुष्काळाची वारंवारता
  • भूजल स्थिती
  • अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांचे एकूण क्षेत्राचे प्रमाण
  • दरमहा 5 हजार रुपये पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या लोकसंख्येचे प्रमाण
  • अनुसूचित जाती व जमातीचे एकूण लोकसंख्येचे प्रमाण
  • शेतमजुरांचे एकूण मजुरांशी प्रमाण
  • शेतकरी आत्महत्या
  • एकूण साक्षरता व महिला साक्षरतेची तफावत
  • गावाचे पशुधन निर्देशांक

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024:जिल्ह्यांची यादी

चला तर मग शेतकरी बांधवांनो, जाणून घेऊया “नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना 2024” ही कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये राबविली जात आहे?

  1. संभाजीनगर
  2. बीड
  3. जालना
  4. जळगाव
  5. लातूर
  6. उस्मानाबाद
  7. नांदेड
  8. परभणी
  9. हिंगोली
  10. अमरावती
  11. बुलढाणा
  12. अकोला
  13. वाशिम
  14. यवतमाळ
  15. वर्धा
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024:पात्रता, अटी व शर्ती

चला तर मग शेतकरी बांधवांनो, जाणून घेऊया “नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना 2024” चा लाभ घेण्यासाठी काय काय पात्रता आवश्यक आहे? कोणत्या अटी व शर्ती आहेत?

  • Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024 (नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना 2024) च्या माध्यमातून लाभ मिळवण्यासाठी इच्छुक असणारा अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना सदर योजनेच्या अर्ज करता येणार नाही, त्यांना या योजनेच्या माध्यमातून लाभ नाही.
  • अर्जदार व्यक्ती हा शेतकरी असणे आवश्यक आहे.
  • तसेच अर्जदार व्यक्ती हा लघु व मध्यमवर्गीय शेतकरी असणे आवश्यक आहे.

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे

चला तर मग शेतकरी बांधवांनो, जाणून घेऊया “नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

  • अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • ओळखपत्र
  • अर्जदारचा मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज आकाराचे फोटो

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मग शेतकरी बांधवांनो, जाणून घेऊया “नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?

● ऑनलाइन अर्ज पद्धत

  • Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024 (नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना 2024) च्या माध्यमातून लाभ मिळविण्यासाठी अर्जदारास ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
  • त्यासाठी अर्जदारास सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024
  • अधिकृत वेबसाइट उघडल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
  • नवीन पेज उघडल्यानंतर तुम्हाला सदर योजनेचा अर्ज पीडीएफ डाउनलोड करावा लागणार आहे.
  • अर्ज डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती म्हणजेच तुमचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर ई सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी लागणार आहे.
  • संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आता तुम्हाला आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत.
  • तुम्हाला आता भरलेला अर्ज पुन्हा एकदा व्यवस्थित तपासून घ्यावा लागणार आहे. अर्जात भरलेली माहिती अचूक आहे की नाही याची खात्री करा.
  • अर्जात भरलेली सर्व माहिती अचूक असल्यास तुम्ही अर्जाच्या खाली दिलेल्या पत्त्यावर तुमचा अर्ज जमा करू शकता.
  • अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024 (नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना 2024) ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हालानानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना 2024 ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 मोफत शिलाई मशीन योजना 2024
मोदी आवास घरकुल योजना 2024बीज भांडवल योजना 2024
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024गाय गोठा अनुदान योजना 2024
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४डिझेल पंप सबसिडी योजना 2024
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४ इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2024
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024
इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना 2024श्रावण बाळ योजना 2024
जिव्हाळा कर्ज योजना 2024ताडपत्री अनुदान योजना 2024
किशोरी शक्ती योजना 2024विलासराव देशमुख अभय योजना 2024
नवीन स्वर्णिमा योजना 2024बांधकाम कामगार योजना 2024
मल्चिंग पेपर योजना 2024अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024:FAQ’s
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024 (नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना 2024) ही कोणी सुरू केली आहे?

सदर योजना ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत सुरू करण्यात आलेली योजना आहे.

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024 (नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?

आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणे ही या योजनेचे मुख्य उद्देश आहे.

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024 (नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना 2024) चा लाभ कोणाला मिळणार आहे?

सदर योजनेचा लाभ हा महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना मिळणार आहे.

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024 (नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?

नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना 2024 चा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.