Rashtriya Kutumb Labh Yojana 2024:राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना 2024

Table of Contents

Rashtriya Kutumb Labh Yojana In Marathi 2024

Rashtriya Kutumb Labh Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या या लेखात राष्ट्रीय कुटुंब योजनेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. ही योजना कोणी सुरू केली? ही योजना नक्की काय आहे? या योजनेचे मुख्य उद्देश काय आहे? या योजनेची वैशिष्ट्ये काय काय आहेत? आणि महत्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून कोण लाभ घेऊ शकतो? या योजनेसाठी काय काय पात्रता आवश्यक आहे? त्याचबरोबर या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण या लेखाद्वारे सविस्तरपणे पाहणार आहोत.

मित्रांनो, केंद्र आणि राज्य सरकार आपल्या राज्यातील महिलांसाठी, राज्यातील तरुणांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी, त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी सतत नवनवीन योजना राबवत असते. जेणेकरून आपल्या राज्यातील नागरिकांचा आर्थिक आणि सामाजिक विकास व्हावा, त्यांचे भविष्य उज्वल व्हावे. अशीच एक योजना राज्य सरकारने सुरू केली आहे ती म्हणजे Rashtriya Kutumb Labh Yojana 2024 (राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना 2024) होय.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना 2024 च्या माध्यमातून राज्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील कर्त्या स्त्री किंवा पुरुषाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या कुटुंबांना उदरनिर्वाहासाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील दारिद्र्य रेषेखालील नागरिकांचा आर्थिक विकास होणार आहे.

Rashtriya Kutumb Labh Yojana 2024

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना 2024 ची थोडक्यात माहिती

योजनेचे नावRashtriya Kutumb Labh Yojana 2024
(राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना 2024)
योजना कोणी सुरू केलीही योजना राज्य सरकारद्वारे सुरू करण्यात आली आहे
राज्यमहाराष्ट्र राज्य
विभागसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य
योजनेचे मुख्य उद्देशराज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबाला आर्थिक सहाय्य करणे
योजनेचे लाभार्थीराज्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंब
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभ20 हजार रुपये
अर्ज करण्याची प्रक्रियाऑफलाइन
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा अर्ज➡️येथे क्लिक करा⬅️ अर्ज
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना 2024 GR➡️येथे क्लिक करा⬅️ शासन निर्णय

Rashtriya Kutumb Labh Yojana 2024:योजना नक्की काय आहे

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना 2024” नक्की काय आहे

Rashtriya Kutumb Labh Yojana 2024 (राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना 2024) ही राज्य सरकारने सुरू केलेली अतीशय महत्वाची अशी योजना आहे. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की आपल्या राज्यातील बहुतांश नागरिक ही आपले जीवन दारिद्र्य रेषेखाली जगत आहेत. त्यांना आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशातच जर कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा अपघाती मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते. त्यांना आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतर कोणावर अवलंबून राहावे लागते, इतर कोणाकडून जास्त व्याजदराने कर्ज घ्यावे लागते. त्यांना अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो.

या सर्व गोष्टींचा काळजीपूर्वक आणि व्यवस्थित विचार करून राज्य सरकारने Rashtriya Kutumb Labh Yojana 2024 (राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना 2024) योजना सुरू करण्याचा अतीशय महत्वाचा असा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या अंतर्गत राज्यातील दारिद्र्य रेषे खालील कुटुंबाला आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील 18 ते 59 वर्षे वयोगटातील कर्ता पुरुष किंवा स्त्रीचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबावर कोणत्याही आर्थिक अडचणी येऊ नये, त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये, त्यांना इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये म्हणून राज्य शासनामार्फत त्यांच्या कुटुंबाला 20 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात येते.

Rashtriya Kutumb Labh Yojana 2024:योजनेचे मुख्य उद्देश

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना 2024” चे मुख्य उद्देश काय आहे?

  • राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना 2024 मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये, त्यांना कोणत्याही आर्थिक समस्या येऊ नये म्हणून त्यांना आर्थिक सहाय्य करणे
  • राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना 2024 अंतर्गत राज्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचे जीवनमान सुधारणे.
  • या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबाला आर्थिक मदत करणे.
  • राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणे.
  • त्यांना आता आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.

Rashtriya Kutumb Labh Yojana 2024:योजनेचे वैशिष्ट्ये

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना 2024” चे वैशिष्ट्ये काय आहे?

  • ही योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य सरकार मार्फत राबविण्यात आलेली एक अतीशय महत्वाची योजना आहे.
  • घरातील कमवत्या व्यक्तीच्या अपघाती मृत्यूमुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये, त्यांना कोणत्याही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये या उद्देशाने राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांचा आर्थिक आणि सामाजिक विकास होईल.
  • तसेच कुटुंबाचे जीवनमान देखील सुधारण्यास मदत होणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी कुटुंबास 20 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
  • ही लाभाची रक्कम लाभार्थी असलेल्या व्यक्तीच्या बँक खात्यात थेट डीबीटी च्या सहाय्याने जमा केली जाईल.
  • महत्वाचं म्हणजे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कुटुंब लाभ योजने साठी दरवर्षी 45 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करते.

Rashtriya Kutumb Labh Yojana 2024:लाभार्थी

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना 2024” चा लाभ कोण कोण घेऊ शकतो?

  • राज्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील 18 ते 59 वर्षे वयोगटातील व्यक्ती
  • त्याचबरोबर राज्यातील विधवा महिला, घटस्फोटीत महिला, एकल महिला प्रमुख असलेले कुटुंब

Rashtriya Kutumb Labh Yojana 2024:आर्थिक सहाय्य

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना 2024” च्या माध्यमातून किती आर्थिक सहाय्य मिळणार आहे?

  • राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबे तसेच दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा अचानक अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला 20 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे.
  • सदर कुटुंबातील 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी शैक्षणिक अनुदान दिले जाणार आहे.
  • त्याचबरोबर कुटुंबातील 75 वर्षे वयोगटातील व्यक्तींना दर महिना 600 रुपये पेन्शन दिली जाईल.
Rashtriya Kutumb Labh Yojana 2024

Rashtriya Kutumb Labh Yojana 2024:पात्रता, अटी व शर्ती

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना 2024” साठी कोण कोण पात्र आहे? काय काय अटी व शर्ती आहेत?

  • सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही, त्यांना या योजनेच्या माध्यमातून कोणताही लाभ दिला जाणार नाही.
  • सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे नाव दारिद्र्य रेषेखालील यादी मध्ये असणे आवश्यक आहे.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  • कुटुंबातील व्यक्तीने आत्महत्या केली असल्यास अशावेळी कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • कुटुंबातील व्यक्तीचा अपघाती किंवा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला असेल तरच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  • तसेच कुटुंबातील कोणताही व्यक्ती राज्य किंवा केंद्र शासनाचा कर्मचारी नसावा, तरच या योजनेचा लाभ घेता येईल.
  • 18 ते 59 वर्षे वयोगटातील व्यक्तींनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना 2024 चा लाभ मिळविण्यासाठी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील कमवत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर, सदर कुटुंबातील व्यक्तींनी मृत्यूच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे. त्यानंतर अर्ज केल्यास सदर अर्ज नाकारले जातील.

Rashtriya Kutumb Labh Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • जन्म दाखला
  • दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र
  • बँक खात्याचा तपशील
  • प्रतिज्ञा पत्र
  • पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
  • मृत्यू पत्र

Rashtriya Kutumb Labh Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?

● ऑफलाइन अर्ज प्रक्रिया

  • Rashtriya Kutumb Labh Yojana 2024 (राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना 2024) चा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्जदारास सर्वप्रथम आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तलाठी कार्यालयामध्ये जावे लागेल.
  • सदर कार्यालयात गेल्यानंतर तेथून तुम्हाला “राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना 2024” चा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्ज घेतल्यानंतर त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
  • तसेच त्यासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडायची आहेत.
  • आणि त्यानंतर भरलेला अर्ज संबंधित कार्यालयात जमा करायचा आहे.
  • आणि शेवटी तुमच्या अर्जाची आणि कागदपत्रांची संबंधित अधिकाऱ्याकडून तपासणी केली जाईल, त्यानंतर सदर योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ मिळेल.
  • अशा प्रकारे मित्रांनो, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना 2024 ची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हालाराष्ट्रीय कुटुंब लाभ योजना 2024 ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४मोफत शिलाई मशीन योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४बीज भांडवल योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024
दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024आंतरजातीय विवाह योजना 2024
माझा लाडका भाऊ योजना 2024नाबार्ड योजना महाराष्ट्र 2024
महाराष्ट्र स्वाधार योजना 2024खावटी अनुदान योजना 2024
सामूहिक विवाह योजना महाराष्ट्र 2024शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2024
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024किशोरी शक्ती योजना 2024
बांधकाम कामगार योजना 2024हर घर नल योजना 2024
आत्मनिर्भर भारत रोजगार योजना 2024बाल संगोपन योजना 2024
Rashtriya Kutumb Labh Yojana 2024:FAQ’s
Rashtriya Kutumb Labh Yojana 2024 (राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना 2024) ची सुरुवात कोणी केली आहे?

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत करण्यात आली आहे.

Rashtriya Kutumb Labh Yojana 2024 (राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?

सदर योजनेचे मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबाला आर्थिक सहाय्य करणे

Rashtriya Kutumb Labh Yojana 2024 (राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना 2024) चा लाभ कोण कोण मिळवू शकतो?

सदर योजनेचा लाभ हा महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब /दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे मिळवू शकतात.

Rashtriya Kutumb Labh Yojana 2024 (राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना 2024) च्या माध्यमातून काय लाभ मिळणार आहे?

राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबे तसेच दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा अचानक अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला 20 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे.

Rashtriya Kutumb Labh Yojana 2024 (राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?

सदर योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.