Kanya Shadi Sahyog Yojana 2024:आता मिळणार मुलीच्या लग्नासाठी 51,000/- रुपये!

Kanya Shadi Sahyog Yojana 2024 In Marathi

Kanya Shadi Sahyog Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात Kanya Shadi Sahyog Yojana 2024 (कन्या शादी सहयोग योजना 2024) ची सविस्तर माहिती मराठीमध्ये जाणून घेणार आहोत. ही योजना अतीशय महत्वाची अशी योजना आहे. मित्रांनो, या योजनेची सुरुवात राजस्थान सरकारने केली आहे.

राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी 51, 000/- रुपये आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने राजस्थान सरकारने सुरू केलेली “कन्या शादी सहयोग योजना 2024” ही एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.

आपल्याला माहितीच आहे की मुलीचं लग्न म्हंटल की आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांना अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. अशाच गरीब कुटुंबातील मुलींना आपल्या लग्नाच्या खर्चासाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये त्याचबरोबर इतर कोणाकडून जास्त व्याजदराने कर्ज घेण्याची वेळ येऊ नये, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

चला तर मग जाणून घेऊया ही योजना नक्की काय आहे? या योजनेची सुरुवात कोणी आणि कधी केली? या योजनेचे उद्देश काय आहे? काय आहेत या योजनेची वैशिष्ट्ये? या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी कोण कोण पात्र आहेत? त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे? या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा अर्ज कशाप्रकारे करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण खालील लेखात पहाणार आहोत.

Kanya Shadi Sahyog Yojana 2024

कन्या शादी सहयोग योजना 2024 थोडक्यात माहिती

योजनेचे नावKanya Shadi Sahyog Yojana 2024
(कन्या शादी सहयोग योजना 2024)
योजनेची सुरुवात कोणी केलीराजस्थान सरकार
राज्यराजस्थान
योजनेचे मुख्य उद्देशराज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी आर्थिक सहाय्य करणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
योजनेचे लाभार्थीराज्यातील गरीब कुटुंबातील मुली
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभमुलीच्या लग्नासाठी 51,000/- रुपये आर्थिक सहाय्य मिळणार
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन/ ऑफलाइन
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

Kanya Shadi Sahyog Yojana 2024:योजनेचे मुख्य उद्देश

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “कन्या शादी सहयोग योजना 2024” चे मुख्य उद्देश काय काय आहेत?

  • राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींना त्यांच्या लग्नासाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
  • आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या कुटुंबांना मुलीच्या लग्नासाठी इतर कोणाकडून जास्त व्याजदराने कर्ज घेण्याची वेळ येऊ म्हणून आर्थिक मदत करणे.
  • आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राज्यात होणारे बालविवाह थांबविणे, हे देखील या योजनेचे मुख्य उद्देश आहे.

Kanya Shadi Sahyog Yojana 2024: योजनेची वैशिष्ट्ये

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “कन्या शादी सहयोग योजना 2024” ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?

  • आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या मुलींच्या लग्नासाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने राजस्थान सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली ‘कन्या शादी सहयोग योजना 2024’ ही एक अतीशय महत्वाची अशी योजना आहे.
  • कन्या शादी सहयोग योजना 2024 अंतर्गत मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिच्या लग्नासाठी 51,000/- रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
  • या योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम ही लाभार्थी मुलीच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येते.
  • त्याचबरोबर या योजनेचा लाभ हा केवळ एका कुटुंबातील दोन मुलींनाच दिला जातो.
  • आणि सर्वात महत्वाचं या योजनेचा लाभ हा अशाच मुलींना दिला जाईल ज्यांचे लग्न हे आई-वडिलांच्या सहमतीने होत असेल.
  • या योजनेअंतर्गत लग्नाच्या एक महिना पूर्वी किंवा लग्नाच्या 6 महिन्यापर्यंत अर्ज करावा लागणार आहे.

Kanya Shadi Sahyog Yojana 2024:लाभ

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “कन्या शादी सहयोग योजना 2024” च्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे?

आर्थिक लाभकधी मिळणार
31,000/- रुपयेमुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम एका कुटुंबातील जास्ती जास्त दोन मुलींना दिली जाईल.
41,000/- रुपयेमुलीचे शिक्षण 12 वी पर्यंत झाल्यानंतर तसेच मुलीचे वय पूर्ण झाल्यानंतर
51,000/- रुपयेमुलीचे उच्चशिक्षण पूर्ण झाल्यानंतर
Kanya Shadi Sahyog Yojana 2024

Kanya Shadi Sahyog Yojana 2024:पात्रता

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “कन्या शादी सहयोग योजना 2024” साठी काय काय पात्रता आवश्यक आहे?

  • Kanya Shadi Sahyog Yojana 2024 (कन्या शादी सहयोग योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणारी अर्जदार मुलगी ही राजस्थान राज्याची मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.
  • सदर योजनेचा लाभ हा केवळ एका कुटुंबातील दोन मुलींनाच घेता येईल.
  • त्याचबरोबर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 50 हजार रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

Kanya Shadi Sahyog Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “कन्या शादी सहयोग योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहेत?

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • जातीचा दाखला
  • जन्म प्रमाणपत्र
  • लग्नाचे प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • बँक खात्याचा तपशील
  • पासपोर्ट साईज आकाराचे फोटो

Kanya Shadi Sahyog Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया

● ऑनलाइन अर्ज पद्धत :-

  • Kanya Shadi Sahyog Yojana 2024 (कन्या शादी सहयोग योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारास ऑनलाइन /ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो.
  • त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या जवळील ई सेवा केंद्रावर जावे लागणार आहे.
  • त्यानंतर तेथून “कन्या शादी सहयोग योजनेचा अर्ज घ्यावा लागणार आहे.
  • आता तुम्हाला संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक वाचून त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपद्धतीने भरावी लागेल.
  • तसेच अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडावी लागणार आहेत.
  • आणि नंतर भरलेला अर्ज ई सेवा केंद्रात जमा करावा लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स नंबर दिला जाईल, तो तुम्हाला सुरक्षित ठेवावा लागणार आहे.
  • अशा प्रकारे मित्रांनो, तुमची Kanya Shadi Sahyog Yojana 2024 (कन्या शादी सहयोग योजना 2024) ची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “कन्या शादी सहयोग योजना 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४आंतरजातीय विवाह योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४लेक लाडकी योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024
वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना 2024
विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना 2024
महामेष योजना 2024मध केंद्र योजना 2024
महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2024
गोदाम अनुदान योजना 2024छत्रपती शिवाजी महाराज कर्ज मुक्ती योजना 2024
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना 2024आयुष्मान भारत विमा योजना 2024
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 2024महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024
थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजना 2024
Kanya Shadi Sahyog Yojana 2024:FAQ’s
Kanya Shadi Sahyog Yojana 2024 (कन्या शादी सहयोग योजना 2024) ची सुरुवात कोणी केली?

कन्या शादी सहयोग योजना 2024 ची सुरुवात राजस्थान सरकारने केली आहे.

Kanya Shadi Sahyog Yojana 2024 (कन्या शादी सहयोग योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?

राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी आर्थिक सहाय्य करणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.

Kanya Shadi Sahyog Yojana 2024 (कन्या शादी सहयोग योजना 2024) चे लाभार्थी कोण आहेत?

राज्यातील गरीब कुटुंबातील मुली या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यास पात्र आहेत.

Kanya Shadi Sahyog Yojana 2024 (कन्या शादी सहयोग योजना 2024) च्या माध्यमातून काय लाभ मिळणार आहे?

या योजनेच्या माध्यमातून मुलीच्या लग्नासाठी 51,000/- रुपये आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

Kanya Shadi Sahyog Yojana 2024 (कन्या शादी सहयोग योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?

कन्या शादी सहयोग योजना 2024 चा अर्ज ऑनलाइन /ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करायचा आहे.