Mahamesh Yojana 2024:शेळी व मेंढी पालनासाठी मिळणार 75 टक्के अनुदान! पहा संपूर्ण माहिती|

Mahamesh Yojana In Marathi 2024

Mahamesh Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात Mahamesh Yojana 2024 (महामेष योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. महामेष योजनेला राजे यशवंतराव होळकर महामेष योजना म्हणून देखील ओळखले जाते. चला तर मग जाणून घेऊया ही योजना नक्की काय आहे? ही योजना कोणी सुरू केली? या योजनेचे मुख्य उद्देश आणि वैशिष्ट्ये काय काय आहेत? या योजनेच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांना काय काय लाभ मिळणार आहे? आणि महत्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून कोण कोण लाभ मिळवू शकतो? या योजनेचा अर्ज करताना कोणती कोणती कागदपत्रे लागणार आहेत? या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत.

आपल्याला माहितीच आहे की, आपल्या महाराष्ट्र राज्यातील बहुतांश नागरिक हे शेती हा व्यवसाय करतात. महाराष्ट्र राज्यात शेती हा पारंपारिक व्यवसाय मानला जातो. त्याचबरोबर आपल्या राज्यातील नागरिक शेतीसोबतच एखादा जोडधंदा म्हणून शेळ्या किंवा मेंढ्या पालन हा व्यवसाय करत असतात. मात्र राज्यातील बहुतांश शेतकरी मध्यमवर्गीय असल्यामुळे त्यांच्याकडे शेळी व मेंढी खरेदी करण्यासाठी पैसे नसतात, त्यामुळे असे मध्यमवर्गीय शेतकरी एक दोन शेळ्या पाळून त्यांच्या दुधाच्या गरजा पूर्ण करतात.

अलीकडच्या काळात विविध कारणांमुळे असे निदर्शनास आले आहे की, राज्यात शेळ्या व मेंढ्यांची संख्या घटत चालली आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात शेळ्या व मेंढ्यांची होणारी घट थांबविण्यासाठी राज्य सरकारने त्यावर विविध उपाययोजना केल्या आहेत. त्याचबरोबर राज्यातील नागरिकांना तसेच शेतकरी बांधवांना पशुपालनासाठी प्रोत्साहित करण्यासाठी विविध योजना देखील राबविल्या आहेत, त्यातीलच एक योजना म्हणजेच Mahamesh Yojana 2024 (महामेष योजना 2024) होय.

या व्यवसायामुळे शेतकरी बांधवांना भरपूर प्रमाणात फायदा देखील होत आहे. अशाप्रकारे आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांचा आर्थिक आणि सामाजिक विकास होण्यासाठी आपल्या हक्काचे सरकार म्हणजेच महाराष्ट्र राज्य सरकारने ‘राजे यशवंतराव होळकर महामेष योजना 2024’ ही 18 मार्च 2017 रोजी सुरू केली आहे. Mahamesh Yojana 2024 (महामेष योजना 2024) अंतर्गत महाराष्ट्र सरकारमार्फत मेंढीपालनासाठी 75 टक्के अनुदान दिले जाणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या चाऱ्यासाठी देखील 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे.

मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यातील धनगर व तत्सम जातीमधील सुमारे 1 लाख मेंढीपालकांकडून मेंढीपालन हा व्यवसाय केला जातो. त्याचबरोबर पशुपालनामध्ये हे नागरिक शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी अशा पशूंचा सांभाळ करून त्यांच्या निघणाऱ्या दुधावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात, आणि म्हणूनच Mahamesh Yojana 2024 (महामेष योजना 2024) ही एक महत्वाकांक्षी योजना आहे.

Mahamesh Yojana 2024

महामेष योजना 2024 थोडक्यात माहिती

योजनेचे नावMahamesh Yojana 2024
(राजे यशवंतराव होळकर महामेष योजना 2024)
योजनेची सुरुवात कोणी केलीमहाराष्ट्र सरकार
योजनेची सुरुवात कधी करण्यात आली18 मार्च 2017
राज्यमहाराष्ट्र राज्य
विभागपशुसंवर्धन विभाग
योजनेचे मुख्य उद्देशराज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक विकास करणे
योजनेचे लाभार्थीआपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभशेतकऱ्यांना मेंढी पालनासाठी 75 टक्के अनुदान मिळणार
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

Mahamesh Yojana 2024 नक्की काय आहे?

आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना तसेच इतर नागरिकांना पशुपालन व्यवसायासाठी प्रोत्साहित करण्यासाठी तसेच राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास होण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य सरकारच्या पशूसंवर्धन विभागामार्फत 18 मार्च 2017 रोजी Mahamesh Yojana 2024 (महामेष योजना 2024) सुरू करण्यात आली आहे.

Mahamesh Yojana 2024 (महामेष योजना 2024) ला राजे यशवंतराव होळकर महामेष योजना असे देखील म्हंटले जाते. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना तसेच इतर पशुपालन करणाऱ्या नागरिकांना मेंढी पालनासाठी 75 टक्के अनुदान दिले जाणार आहे. तसेच मेंढ्यांच्या चाऱ्यासाठी देखील 50 टक्के अनुदान शासनामार्फत दिले जाणार आहे.

या योजनेच्या माध्यमातून नक्कीच शेतकरी बांधवांना शेती बरोबरच मेंढी पालन व्यवसाय करता येणार आहे. त्यामुळे नक्कीच त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होऊन त्यांचा आर्थिक विकास होण्यास हातभार लागणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी राज्य सरकारने सुरू केलेली Mahamesh Yojana 2024 (महामेष योजना 2024) ही एक अतीशय महत्वाची अशी योजना आहे.

Mahamesh Yojana 2024:योजनेचे उद्देश

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “महामेष योजना 2024” चे मुख्य उद्देश काय काय आहे?

  • आपल्या राज्यातील जे शेतकरी पशूपालनासाठी म्हणजेच मेंढी पालनासाठी इच्छुक आहेत, अशा शेतकऱ्यांना मेंढी खरेदी करण्यासाठी राजे यशवंतराव होळकर महामेष योजना 2024 अंतर्गत 75 टक्के अनुदान उपलब्ध करून देणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
  • राज्यातील शेळी व मेंढ्यांच्या संख्येत वाढ करणे, हे देखील या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
  • त्याचबरोबर राज्यात नवनवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
  • राज्यातील शेतकरी तसेच इतर नागरिकांना शेळी व मेंढी पालन व्यवसायासाठी प्रोत्साहित करणे.
  • राज्यातील शेतकरी बांधवांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणे.
  • तसेच शेतकऱ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
  • आपल्या राज्यात जास्तीत जास्त विविध प्रजातींच्या मेंढ्यांचा प्रसार करणे.

Mahamesh Yojana 2024:योजनेची वैशिष्ट्ये

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “महामेष योजना 2024” ची वैशिष्ट्ये काय काय आहे?

  • महाराष्ट्र राज्य शासनाच्या पशूसंवर्धन विभागामार्फत 18 मार्च 2017 रोजी Mahamesh Yojana 2024 (महामेष योजना 2024) म्हणजेच राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • या योजनेमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र आणि बकरी विभाग निगम नोडल एजन्सीच्या रूपात कार्य करते.
  • या योजनेअंतर्गत 45.81 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
  • महाराष्ट्र राज्य शासनामार्फत राज्यामध्ये शेळी व मेंढी पालनासाठी इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली ही एक महत्वाची अशी योजना आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी तसेच इतर पशुपालन करणाऱ्या नागरिकांना मेंढी पालनासाठी शासनामार्फत 75 टक्के अनुदान दिले जाणार आहे.
  • त्याचबरोबर मेंढ्यांच्या चाऱ्यासाठी देखील शासन 50 टक्के अनुदान देणार आहे.
  • आपल्या राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील लाभार्थी या योजनेच्या माध्यमातून लाभ घेऊ शकणार आहेत.
  • त्याचप्रमाणे या योजनेच्या माध्यमातून आपळाय राज्यातील शेतकरी बांधवांचा आणि इतर पशुपालकांचा आर्थिक आणि सामाजिक विकास होण्यास मदत होणार आहे.
  • तसेच राज्यातील शेतकरी सशक्त व आत्मनिर्भर बनणार आहेत.
  • या योजनेची अर्ज करण्याची प्रक्रिया अतीशय सोपी असल्यामुळे शेतकरी पशुपालक आता घरी बसून आपल्या मोबाईलच्या सहाय्याने ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
  • त्यामुळे या योजनेचा अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना कुठल्याही सरकारी कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही.
Mahamesh Yojana 2024

Mahamesh Yojana 2024:योजनेचे लाभार्थी

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “महामेष योजना 2024” चे लाभार्थी कोण कोण आहेत?

  • महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिक Mahamesh Yojana 2024 (महामेष योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.

Mahamesh Yojana 2024:लाभ

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “महामेष योजना 2024” च्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे?

  • राजे यशवंतराव होळकर महामेष योजना 2024 अंतर्गत 20 मेंढ्या व 1 नर मेंढी गटाचे 75 टक्के अनुदान दिले जाणार आहे.
  • त्याचबरोबर मेंढी पालनासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 75 टक्के अनुदान दिले जाणार आहे.
  • तसेच त्यांच्यासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी 75 टक्के अनुदान दिले जाते.
  • त्याचबरोबर आवश्यक असणाऱ्या हिरव्या चाऱ्याचा मुरघास करण्यासाठी यंत्राची खरेदी करण्यासाठी 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे.
  • आणि महत्वाचं म्हणजे पशूखाद्य कारखाने उभारण्यासाठी देखील शासनामार्फत 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे.
  • या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड करताना महिलांसाठी 30 टक्के व अपंगांसाठी 3 टक्के आरक्षण देण्यात आले आहे.
  • त्याचबरोबर या योजनेअंतर्गत भटक्या जमाती प्रवर्गातील बचत गटांना पशुपालक उत्पादक कंपन्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
Mahamesh Yojana 2024

Mahamesh Yojana 2024:पात्रता, अटी व शर्ती

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “महामेष योजना 2024” साठी काय काय पात्रता आवश्यक आहे? कोणत्या कोणत्या अटी व शर्ती असणार आहेत?

  • Mahamesh Yojana 2024 (महामेष योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणारा अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • त्याचबरोबर अर्जदार व्यक्ती हा भटक्या जमाती मधील असणे आवश्यक आहे.
  • सदर योजनेचा लाभ हा फक्त महाराष्ट्र राज्यातील नगरिकांनाच दिला जाणार आहे.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा अर्ज करता येणार नाही, तसेच त्यांना कोणत्याही प्रकारचा लाभ दिला जाणार नाही.
  • या योजनेचा लाभ हा केवळ एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला घेता येणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदाराचे वय 18 वर्ष ते 60 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • संबंधित अर्जदाराचे आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे.
  • तसेच मेंढी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांनाकडे शेड बांधण्यासाठी स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे.
  • महत्वाचं म्हणजे अर्जदाराच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कार्यरत नसावा.

Mahamesh Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “महामेष योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • जमिनीची कागदपत्रे
  • जमिनीत सह हिस्सेदार असल्यास ना हरकत प्रमाणपत्र
  • पशुपालन प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • वयाचा पुरावा
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • पासपोर्ट साईज आकाराचे फोटो

Mahamesh Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “महामेष योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?

● ऑनलाइन अर्ज पद्धत :-

  • सदर योजनेच्या माध्यमातून लाभ मिळविण्यासाठी अर्जदारास ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत.
  • त्यासाठी अर्जदारास सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.
  • अधिकृत वेबसाइट उघडल्यानंतर होमपेज वरील ‘महामेष योजना’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, त्यामध्ये तुम्हाला ‘अर्जदार लॉगइन’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल, त्यामध्ये तुम्हाला लॉगइन करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती भरावी लागणार आहे.
  • आता तुमच्यासमोर सदर योजनेचा अर्ज उघडेल.
  • अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला काळजीपूर्वक तसेच अचूकपद्धतीने भरायची आहे.
  • संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला ‘सेव’ या बटणावर क्लिक करायचे आहे.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर दुसरे पेज उघडेल, त्यामध्ये अर्जदारास कुठल्या घटकांमध्ये लाभ घ्यायचा आहे, याबाबतची माहिती भरावी लागणार आहे.
  • या योजनेअंतर्गत घटक निवड करत असताना तालुक्याचे उद्दिष्ट तपासून त्यानुसार योजनेमधील कोणत्या उपघटकांमध्ये लाभ घ्यायचा आहे, त्याची निवड करावी लागणार आहे.
  • संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आता तुम्हाला ‘सबमीट’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर ‘एप्लीकेशन फॉर्म इज सबमिटेड सक्सेसफुली’ असा तुम्हाला मेसेज येईल.
  • अशा प्रकारे मित्रांनो, तुमची Mahamesh Yojana 2024 (महामेष योजना 2024) ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “महामेष योजना 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना २०२४
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४आंतरजातीय विवाह योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४पीक कर्ज योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024
गाय गोठा अनुदान योजना 2024डिझेल पंप सबसिडी योजना 2024
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024जिव्हाळा कर्ज योजना 2024
ताडपत्री अनुदान योजना 2024प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप अनुदान योजना 2024
कुक्कुट पालन कर्ज योजना 2024अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 2024
कृषी उन्नती योजना 2024राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024
महाडीबीटी शेतकरी योजना 2024प्रधान मंत्री रोजगार प्रोत्साहन योजना 2024
मध केंद्र योजना 2024महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024
सुभद्रा योजना 2024
Mahamesh Yojana 2024:FAQ’s
Mahamesh Yojana 2024 (महामेष योजना 2024) ची सुरुवात कोणी आणि कधी केली?

सदर योजनेची सुरुवात महाराष्ट्र राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत 18 मार्च 2017 रोजी करण्यात आली आहे.

Mahamesh Yojana 2024 (महामेष योजना 2024) चे मुख्य उद्देश काय?

राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.

Mahamesh Yojana 2024 (महामेष योजना 2024) च्या माध्यमातून काय लाभ मिळणार आहे?

या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना मेंढी पालनासाठी शासनामार्फत 75 टक्के अनुदान दिले जाणार आहे. तसेच त्यांच्या चाऱ्यासाठी देखील 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे.

Mahamesh Yojana 2024 (महामेष योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?

Mahamesh Yojana 2024 (महामेष योजना 2024) चा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.