Vanyaprani Nuksan Bharpai Yojana 2024: वन्यप्राण्यांचा हल्ला झाल्यास सरकार देणार 25 लाखांचे आर्थिक सहाय्य!!

Table of Contents

Vanyaprani Nuksan Bharpai Yojana In Marathi 2024

Vanyaprani Nuksan Bharpai Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखात आपण Vanyaprani Nuksan Bharpai Yojana 2024 (वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024) ची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, वन्यप्राणी नुकसान भरपाई योजनेच्या माध्यमातून वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी किंवा मृत्यू झाल्यास शासनामार्फत 25 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया नक्की काय आहे ही योजना? काय आहेत या योजनेचे फायदे? या योजनेच्या अटी व शर्ती काय काय आहेत? कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहेत? या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत.

मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यात बहुतांश नागरिक हे ग्रामीण भागात राहतात. ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी वन्य प्राण्यांचा मोठ्याप्रमाणात वावर असतो. त्यामध्ये वाघ, बिबट्या, लांडगा, तरस, कोल्हा, अस्वल, मगर, हत्ती, माकड, रान कुत्रे, रान डुक्कर, वानर या प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो किंवा ती व्यक्ती गंभीर जखमी होते. काही प्राण्यांच्या हल्ल्यात नागरिकांचा मृत्यू देखील होतो. आज देखील आपल्या राज्यामध्ये ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक आपले जीवन हे दारिद्र्यरेषेखाली जगत आहेत. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात नुकसान झाल्यावर त्यांच्याकडे औषधोपचार करण्यासाठी पुरेसे पैसे जवळ नसतात, परिणामी तत्यांचा मृत्यू देखील होतो. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते, त्यांना खूप आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो.

मित्रांनो आपण रोजच्या जीवनात आपल्या मोबाईल मध्ये, टीव्ही समोर, तसेच वर्तमान पत्रात एक तरी बातमी पाहायला मिळते की, कोणत्या न कोणत्या ठिकाणी प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला किंवा गंभीर जखमी झाले. त्याचप्रमाणे काही ठिकाणी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर देखील हे वन्यप्राणी हल्ला करतात. परिणामी संबंधित शेतकऱ्याला मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसान होते. या सर्व समस्यांचा काळजीपूर्वक विचार करून आपल्या राज्य शासनाने Vanyaprani Nuksan Bharpai Yojana 2024 (वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024) सुरू करण्याचा अतीशय योग्य निर्णय घेतला आहे.

Vanyaprani Nuksan Bharpai Yojana 2024 (वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024) च्या अंतर्गत वन्य प्राणी जसे की वाघ, बिबट्या, हत्ती, अस्वल, रान कुत्रे, रान डुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, नीलगाय, माकड यांनी हल्ला केल्यास एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तसेच या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एखाद्या व्यक्तीस कायमचे अपंगत्व आल्यास किंवा एखादी व्यक्ती या प्राण्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यास सदर व्यक्तीस राज्य शासनाच्या मदतीने आर्थिक सहाय्य केले जाते.

महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत ही योजना राबविण्यात आली आहे. वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024 च्या अंतर्गत नुकसान झालेल्या व्यक्तीस राज्यशासनाच्या मदतीने 25 लाखांचे अर्थसहाय्य केले जाते. या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या 25 लाख रुपयांच्या आर्थिक सहाय्याने वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात नुकसान झालेल्या व्यक्तीस कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण येणार नाही. सर्वसामान्य नागरिकांना वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू किंवा गंभीर जखमी झाल्यास आर्थिक सहाय्य म्हणजेच नुकसान भरपाई देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.

Vanyaprani Nuksan Bharpai Yojana 2024

वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024:थोडक्यात माहिती

योजनेचे नावVanyaprani Nuksan Bharpai Yojana 2024
(वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024)
राज्यमहाराष्ट्र
विभागवन विभाग, महाराष्ट्र राज्य
योजनेचे मुख्य उद्देशवन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू किंवा गंभीर जखमी झाल्यास आर्थिक सहाय्य म्हणजेच नुकसान भरपाई देणे
योजनेचे लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील नागरिक
लाभ25 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य म्हणजेच नुकसान भरपाई मिळणार
योजनेची अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन/ऑफलाइन
शासन निर्णय {GR}➡️GR येथे पहा⬅️
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

Vanyaprani Nuksan Bharpai Yojana 2024:योजनेचे उद्देश

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया काय काय आहेत या योजेनचे उद्देश ?

  • Vanyaprani Nuksan Bharpai Yojana 2024 (वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024) चे मुख्य उद्देश म्हणजे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात एखादी व्यक्ती जखमी किंवा त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास सदर व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य करणे.
  • वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यास औषधोपचारासाठी लागणाऱ्या खर्चासाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये.
  • नागरिकांना उपचारासाठी आर्थिक मदत करणे.
  • वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्य जखमी किंवा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला अर्थ सहाय्य करणे.
  • वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये या उद्देशाने ही योजना सुरू करण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे.

Vanyaprani Nuksan Bharpai Yojana 2024:योजनेची वैशिष्ट्ये

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024” ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?

  • Vanyaprani Nuksan Bharpai Yojana 2024 (वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024) ही महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाद्वारे राबविण्यात आलेली एक अतीशय महत्वाची योजना आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात नुकसान झालेल्या नागरिकांना शासनामार्फत 25 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
  • या योजने अंतर्गत मिळणारी ही लाभाची रक्कम लाभार्थी व्यक्तीच्या बँक खात्यात थेट डीबीटी च्या सहाय्याने जमा करण्यात येणार आहे.
  • न्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024 ची अर्ज प्रक्रिया अतीशय सोपी ठेवण्यात आली आहे.
  • सदर योजनेची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने असल्यामुळे नागरिकांना घर बसल्या आपल्या मोबाईलच्या सहाय्याने अर्ज करता येणार आहे.
  • नागरिकांना कुठल्याच सरकारी कार्यालयात जाण्याची गेज भासणार नाही, त्यामुळे त्यांचे पैसे आणि वेळ यांची बचत होईल.

Vanyaprani Nuksan Bharpai Yojana 2024:योजनेचे लाभार्थी

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024” चे लाभार्थी कोण कोण आहेत?

  • महाराष्ट्र राज्यातील वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात नुकसान झालेले नागरिक

Vanyaprani Nuksan Bharpai Yojana 2024:योजनेचे फायदे

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024” चे फायदे काय काय आहेत?

  • पीक नुकसान
    • नागरिकांच्या पिकाचे नुकसान झाल्यास पिकाच्या बाजारभावाच्या 75 टक्के पर्यंत आर्थिक मदत केली जाईल.
  • मच्छीमारी साहित्य नुकसान
    • मच्छीमारी साहित्याची संपूर्ण नुकसान भरपाई केली जाईल.
  • पशुधन मृत्यू
    • यासाठी बाजारमूल्य किंवा 15,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाईल.
  • मनुष्य जीवितहानी
    • वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास व्यक्तीच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाईल.

Vanyaprani Nuksan Bharpai Yojana 2024:आर्थिक सहाय्य

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024” च्या माध्यमातून किती आर्थिक सहाय्य केले जाणार आहे?

तपशीलआर्थिक सहाय्य
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास25 लाख रुपये
व्यक्ती गंभीर जखमी झाल्यास5 लाख रुपये
व्यक्ती कायमस्वरूपी अपंग झाल्यास7.50 लाख रुपये
व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यासऔषधोपचारासाठी खर्च दिला जाईल मात्र खाजगी रुग्णालयामध्ये औषध उपचार करणे अनिवार्य आहे. त्याची मर्यादा 50,000/- प्रति व्यक्ती इतकी असेल.
Vanyaprani Nuksan Bharpai Yojana 2024

Vanyaprani Nuksan Bharpai Yojana 2024:पात्रता, अटी व शर्ती

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024” च्या माध्यमातून किती आर्थिक सहाय्य केले जाणार आहे?

  • Vanyaprani Nuksan Bharpai Yojana 2024 (वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024) चा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्याच्या व्यतिरिक्त बाहेरील राज्याच्या नागरिकांना या योजनेचा अर्ज करता येणार नाही, त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्याच्या नगरिकांनाच दिला जाईल.
  • नागरिकांनी जर एखाद्या वन्य प्राण्याची शिकार केली असेल किंवा एखाद्या प्राण्याला इजा पोचवली असेल आणि अशा प्राण्यांनी मानुष्यावर हल्ला केल्यास सदर नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज केल्यास वन अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करतील आणि त्यानंतर या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जाईल.

Vanyaprani Nuksan Bharpai Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

  • अर्जदार व्यक्तीचे आधार कार्ड
  • रेश कार्ड
  • रहिवासी दाखला
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • वैद्यकीय प्रमाणपत्र
  • वन अधिकाऱ्यांचा दाखला
  • जातीचा दाखला
  • प्रतिज्ञापत्र
  • पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
  • हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्यास मृत्यू प्रमाणपत्र
  • FIR
  • शव विच्छेदन अहवाल

Vanyaprani Nuksan Bharpai Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?

●ऑनलाइन अर्ज पद्धत

  • अर्जदाराला सर्वप्रथम वनविभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर तुमच्यासमोर होमपेज उघडेल, त्यावर ‘वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे व्यक्ती जखमी किंवा मृत झाल्यास आर्थिक सहाय्य मंजूर करणे’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन अर्ज उघडेल.
  • अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक आणि अचूकपणे भरायची आहे.
  • संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
  • भरलेला अर्ज पुन्हा एकदा तपासून घ्या, त्यामध्ये भरलेली माहिती योग्य आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे.
  • संपूर्ण माहिती योग्य असल्यास आता ‘सबमिट’ या पर्यायावर क्लिक करा.
  • अशा प्रकारे मित्रांनो, वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024 ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हालावन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024 ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४मोफत शिलाई मशीन योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४बीज भांडवल योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024
दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024आंतरजातीय विवाह योजना 2024
पीक कर्ज योजना 2024डिझेल पंप सबसिडी योजना 2024
चंदन कन्या योजना 2024इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2024
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024गाय गोठा अनुदान योजना 2024
अपंग बस सवलत योजना 2024सुभद्रा योजना 2024
Vanyaprani Nuksan Bharpai Yojana 2024:FAQ’s
Vanyaprani Nuksan Bharpai Yojana 2024 (वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024) ही कोणी सुरू केली आहे?

सदर योजना महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने सुरू केली आहे.

Vanyaprani Nuksan Bharpai Yojana 2024 (वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024) चे उद्देश काय आहे?

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू किंवा गंभीर जखमी झाल्यास आर्थिक सहाय्य म्हणजेच नुकसान भरपाई देणे.

Vanyaprani Nuksan Bharpai Yojana 2024 (वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024) च्या माध्यमातून किती लाभ मिळणार आहे?

या योजनेच्या माध्यमातून 25 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य म्हणजेच नुकसान भरपाई मिळणार आहे.

Vanyaprani Nuksan Bharpai Yojana 2024 (वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?

सदर योजनेचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.