Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana In Marathi 2024
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या लेखात Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana 2024 (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या या योजनेच्या माध्यमातून आपल्या राज्यातील व्यवसाय करू इच्छिणाऱ्या महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाणार आहे.
महाराष्ट्र सरकार आपल्या राज्यातील महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी तसेच त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून सतत नवनवीन योजना राबविण्याचा निर्णय घेत असते. आपल्या राज्यातील महिलांनी सर्वच क्षेत्रात आपले स्थान प्राप्त करावे. त्याचबरोबर सर्वच क्षेत्रात प्रगती करावी म्हणून विविध योजनांची घोषणा आपले महाराष्ट्र राज्य सरकार करत असते. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 28 जून 2024 रोजी अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर करत असताना त्यांनी आपल्या राज्यातील महिलांच्या कल्याणाकरिता विविध योजनांची घोषणा केली. त्यातीलच एक योजना म्हणजे Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana 2024 (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना 2024) होय.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना 2024 अंतर्गत आपल्या राज्यातील महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा उद्योगधंदा सुरू करण्यासाठी 1 ते 25 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. जेणेकरून महिला आपल्या राज्यातील महिला देखील स्वतःच्या पायावर उभे रहातील. त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून आपल्या राज्यातील महिला स्वावलंबी बनणार आहेत, तसेच महिला सशक्त व आत्मनिर्भर बनणार आहेत.
या योजनेमुळे आपल्या राज्यातील महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करतील आणि आपल्या राज्यातील महिलांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल. महत्वाचं म्हणजे या योजनेमुळे राज्यातील इतर महिला देखील स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहित होतील. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना 2024 चा फायदा हा फक्त आपल्या राज्यातील महिलांनाच मिळणार आहे. त्यामुळे आपल्या राज्यातील महिलांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.
बहुतांश महिला आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करतात परंतु त्यांच्याकडे विशेष सहाय्य आणि व्यवसायासाठी लागणारा निधी अपुरा असल्यामुळे त्यांना व्यवसायात यशस्वी होणे अवघड होते. अशावेळी त्यांना योग्य मार्गदर्शनाची आणि आवश्यक असणाऱ्या पुरेपूर भांडवलाची गरज असते. या गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना 2024 सुरू करण्याचा अतीशय योग्य असा निर्णय घेतला आहे. जेणेकरून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये.
मित्रांनो, या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना 2024 चा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया नक्की काय आहे ही योजना? या योजनेच्या माध्यमातून महिलांना किती लाभ मिळणार आहे? काय आहेत या योजनेच्या अटी व शर्ती? या योजनेचा लाभ अर्ज करण्यासाठी महिलांकडे कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहेत? या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती या आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना 2024:थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana 2024 (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना 2024) |
योजना कोणी सुरू केली | महाराष्ट्र राज्य सरकार |
योजनेची सुरुवात कधी झाली | 2024 |
राज्य | महाराष्ट्र राज्य |
विभाग | कौशल्य रोजगार उद्योजकता आणि इनोव्हेशन विभाग |
योजनेचे लाभार्थी | राज्यातील उद्योजक महिला |
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभ | स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य म्हणून 1 ते 25 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणे |
योजनेचे मुख्य उद्देश | आपल्या राज्यातील महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाइट | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana 2024:योजनेचे मुख्य उद्देश
काय आहेत “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना 2024” चे उद्देश?
- महाराष्ट्र राज्यातील महिलांना स्वतःचा एखादा स्टार्टअप/ व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ देणे हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
- त्याचबरोबर राज्यातील महिलांच्या नेतृत्वाखाली सुरू असणाऱ्या व्यवसायांना पाठिंबा देणे.
- राज्यातील महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
- तसेच राज्यातील महिलांमध्ये असणाऱ्या बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे.
- राज्यातील इतर महिलांना स्टार्टअप / व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
- महाराष्ट्र राज्याची देशातील सर्वात जास्त महिला स्टार्टअप असलेले राज्य म्हणून ओळख तयार करणे.
- आपल्या महाराष्ट्र राज्यात नवनवीन रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे.
- राज्यातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणे.
- या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणे हे देखील या योजनेचे उद्देश आहे.
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana 2024:लाभार्थी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना 2024 साठी लाभार्थी कोण कोण आहेत?
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना 2024 चा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलाच घेऊ शकतील.
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana 2024:लाभ
जाणून घेऊया पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना 2024 च्या माध्यमातून काय काय लाभ मिळणार आहे?
- Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana 2024 (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना 2024) च्या माध्यमातून आपल्या राज्यातील महिलांना स्वतःचा स्टार्टअप /व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 ते 25 लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य करणे.
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana 2024:पात्रता, अटी व शर्ती
चला तर मग जाणून घेऊया “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना 2024” साठी काय काय पात्रता आणि काय काय अटी व शर्ती आहेत?
- या योजनेचा अर्ज करू इच्छिणारी अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील महिलांना या योजनेचा अर्ज करता येणार नाही, तसेच त्यांना या योजनेच्या माध्यमातून कोणताही लाभ मिळणार नाही.
- या योजनेचा लाभ हा फक्त महिलांनाच मिळणार आहे.
- स्टार्टअप आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, भारत सरकार, डीपीआयआयटी (डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री & इंटर्नल ट्रेड) यामध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे.
- स्टार्टअप/व्यवसायाची नोंदणी महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.
- व्यवसायामध्ये महिला संस्थापकाचा किमान 51 टक्के हिस्सा असणे आवश्यक आहे.
- महिलांनी चालू केलेला व्यवसाय हा कमीत किमी एक वर्षापासून कार्यरत असणे आवश्यक आहे.
- महिलांनी सुरू केलेल्या स्टार्टअप/व्यवसायाची वार्षिक उलाढाल 10 लाख ते 1 कोटी दरम्यान असणे आवश्यक आहे.
- अर्जदार महिलांनी या आधी महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवलेला नसावा.
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana 2024:स्टार्टअप निवड
- या योजनेअंतर्गत आश्वासक आणि नावीन्यपूर्ण तसेच प्रभावी स्टार्टअपला प्राधान्य देण्यात येणार आहे.
- ज्या स्टार्टअप /व्यवसायातून मोठ्याप्रमाणात रोजगार निर्मिती होईल, अशा व्यवसायांना देखील विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.
- स्टार्टअप निवड प्रक्रियेसाठी महाराष्ट्र शासनामर्फत विविध समित्या नेमण्यात येणार आहे.
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे
चला तर मग जाणून घेऊया सदर योजनेचा अर्ज करण्यासाठी महिलांकडे कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
- अर्जदार महिलेचे आधार कार्ड
- कंपनी प्रस्ताव
- एमसीए प्रमाणपत्र (कंपनी नोंदणी प्रमाणपत्र)
- डीपीआयआयटी प्रमाणपत्र
- लेखापरीक्षण अहवाल
- कंपनीचा लोगो
- कंपनीच्या संस्थापकाचा फोटो
- उत्पादन सेवा फोटो
- अर्जदाराने या आधी कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेतलेले स्वयंघोषणा पत्र
- कंपनी बँक खाते तपशील
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया
चला तर मग पाहूया “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?
● ऑनलाइन अर्ज पद्धत :-
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना 2024 चा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्जदारास सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
- अधिकृत वेबसाइट ओपन झाल्यानंतर तुमची अर्ज प्रक्रिया सुरू होईल.
- आता तुमच्या समोर सदर योजनेचा अर्ज उघडेल.
- अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला काळजीपूर्वक आणि अचूकपणे भरायची आहे, जसे की स्टार्टअपचे नाव, संस्थापकाचे नाव, कंपनीचे नाव, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर, कंपनीची वेबसाइट, कंपनीचा पत्ता, जिल्हा, शहर, व्यवसायाची उलाढाल ई.
- संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- तुम्हाला अर्ज पुन्हा एकदा तपासून घ्यावा लागेल, अर्जामध्ये भरलेली सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
- त्यानंतर तुम्हाला अर्ज सबमीट करावा लागेल.
- अशा प्रकारे “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना 2024” ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
सारांश
मित्रांनो, आम्ही तुम्हाला “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना 2024“ ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.
धन्यवाद !!
इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana 2024:FAQ’s
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana 2024 (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना 2024) ची सुरूवात कोणी केली आहे?
सदर योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनाने केली आहे.
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana 2024 (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना 2024)चे मुख्य उद्देश काय आहे?
आपल्या राज्यातील महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana 2024 (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना 2024) ची सुरुवात कधी झाली?
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना 2024 ची सुरुवात 2024 ला झाली
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana 2024 (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना 2024) चे लाभार्थी कोण आहे?
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना 2024 साठी फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलाच अर्ज करू शकतील. फक्त महिलांनाच या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जाईल.
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana 2024 (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना 2024) च्या माध्यमातून काय लाभ मिळणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना 2024 च्या माध्यमातून राज्यातील महिलांना स्वतःचा स्टार्टअप/ व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनामार्फत 1 लाख ते 25 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध होणार आहे.
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana 2024 (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना 2024) साठी अर्ज कसा करायचा आहे?
सदर योजनेचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.