Mukhyamantri Rajashri Yojana 2024:”या” राज्यातील मुलींना मिळणार शिक्षणासाठी 50 हजार रुपये आर्थिक सहाय्य!

Table of Contents

Mukhyamantri Rajashri Yojana In Marathi 2024

Mukhyamantri Rajashri Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात Mukhyamantri Rajashri Yojana 2024 (मुख्यमंत्री राजश्री योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून राज्यातील मुलींच्या शिक्षणाच्या दर्जात सुधारणा करण्यासाठी त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी हातभार लागणार आहे.

मित्रांनो, केंद्र आणि राज्य सरकार राज्यातील विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी सतत नवनवीन योजना राबवत असते. अशातच राजस्थान सरकारने राज्यातील मुलींच्या हितासाठी एक योजना सुरू केली आहे, ती म्हणजेच Mukhyamantri Rajashri Yojana 2024 (मुख्यमंत्री राजश्री योजना 2024) होय.

मुख्यमंत्री राजश्री योजना 2024 ही राजस्थान सरकारची योजना आहे. महत्वाचं म्हणजे ही योजना लवकरच आपल्या महाराष्ट्र राज्यात देखील सुरू होण्याची शक्यता आहे. या योजनेचा लाभ हा राज्यातील सर्वच मुलींना मिळणार आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्यातील मुलींचे देखील भविष्य नक्कीच उज्वल होणार आहे.

चला तर मग जाणून घेऊया “मुख्यमंत्री राजश्री योजना 2024” ची सविस्तर माहिती जसे की नक्की काय आहे ही योजना? या योजनेची सुरुवात कोणी आणि कधी केली? या योजनेचे मुख्य उद्देश आणि वैशिष्ट्ये काय काय आहेत? या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी कोण कोण पात्र असणार आहे? या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहेत? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण खालील लेखात पहाणार आहोत.

Mukhyamantri Rajashri Yojana 2024

मुख्यमंत्री राजश्री योजना 2024 थोडक्यात माहिती

योजनेचे नावMukhyamantri Rajashri Yojana 2024
(मुख्यमंत्री राजश्री योजना 2024)
योजनेची सुरुवात कोणी केलीराजस्थान सरकार
योजनेची सुरुवात कधी करण्यात आली01 जून 2016
राज्यराजस्थान
योजनेचे मुख्य उद्देशराज्यातील मुलींचा सर्वांगीण विकास करणे
योजनेचे लाभार्थीराज्यातील मुली
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभया योजनेच्या माध्यमातून 50,000/- रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे
अर्ज करण्याची प्रक्रियाऑफलाइन अर्ज पद्धत
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

Mukhyamantri Rajashri Yojana 2024:योजनेचे उद्देश

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “मुख्यमंत्री राजश्री योजना 2024” चे मुख्य उद्देश काय काय आहेत?

  • राज्यातील मुलींचा सर्वांगीण विकास करण्याच्या मुख्य उद्देशाने सुरू करण्यात आलेली ही योजना आहे.
  • त्याचबरोबर मुलींचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी देखील ही योजना सुरू करण्यात आली आहे.
  • राज्यातील मुलींचा सामाजिक विकास करणे.
  • मुलींच्या जन्मदरामध्ये वाढ करणे त्याचबरोबर त्यांचे पालन पोषण व्यवस्थित व्हावे या उद्देशाने मुख्यमंत्री राजश्री योजना 2024 ची सुरुवात करण्यात आली आहे.
  • सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या होणाऱ्या गर्भपाताला आळा बसणार आहे.

Mukhyamantri Rajashri Yojana 2024:योजनेची वैशिष्ट्ये

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “मुख्यमंत्री राजश्री योजना 2024” ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?

  • Mukhyamantri Rajashri Yojana 2024 (मुख्यमंत्री राजश्री योजना 2024) अंतर्गत शासनामार्फत मुलींना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
  • त्याचबरोबर या योजनेअंतर्गत मुलीला जन्मापासून ते इयत्ता बारावीपर्यंत शिक्षणासाठी सहा हप्त्यांमध्ये 50 हजार रुपये आर्थिक मदत शासनामार्फत केली जाणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील मुलींचा सामाजिक आणि आर्थिक विकास होण्यास हातभार लागेल.
  • मुख्यमंत्री राजश्री योजना 2024 अंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम ही लाभार्थी मुलीच्या किंवा पालकांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
  • तसेच या योजनेमुळे भ्रूणहत्या थांबेल.
  • सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेची अर्ज प्रक्रिया अतीशय सोपी असल्यामुळे अर्ज करतेवेळी कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही.

Mukhyamantri Rajashri Yojana 2024: आर्थिक लाभ

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “मुख्यमंत्री राजश्री योजना 2024” च्या माध्यमातून किती आर्थिक लाभ मिळणार आहे?

मित्रांनो, या योजनेअंतर्गत 1 जून 2016 नंतर राज्यातील सरकारी दवाखान्यात किंवा जननी सुरक्षा योजना अंतर्गत रुग्णालयात जन्मलेल्या मुलींच्या आईला 2,500/- रुपयांचा पहिला हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

पहिला हप्ता2,500/- रुपये मुलीच्या जन्माच्या वेळी
दूसरा हप्ता2,500/- रुपये मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला एक वर्षाच्या आत लागणाऱ्या सर्व लसी दिल्यावर दिले जातील
तिसरा हप्ता4,000/- रुपये मुलगी पहिली वर्गात गेल्यानंतर
चौथा हप्ता5,000/- रुपये मुलगी सहावी वर्गात गेल्यानंतर
पाचवा हप्ता11,000/- रुपये मुलगी दहावी वर्गात प्रवेश घेतल्यानंतर
सहावा हप्ता25,000/- रुपये मुलगी महाविद्यालयात म्हणजेच इयत्ता 12 वी मध्ये गेल्यानंतर
Mukhyamantri Rajashri Yojana 2024

Mukhyamantri Rajashri Yojana 2024:पात्रता

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “मुख्यमंत्री राजश्री योजना 2024” साठी काय काय पात्रता असणे आवश्यक आहे?

  • Mukhyamantri Rajashri Yojana 2024 (मुख्यमंत्री राजश्री योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणारी अर्जदार मुलगी ही राजस्थान राज्याची मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • मुलीचा जन्म 1 जून 2016 नंतर झालेला असणे आवश्यक आहे.
  • त्याचबरोबर मुलीचा जन्म राज्याच्या सरकारी रुग्णालयात किंवा सरकारी योजना मान्यताप्राप्त असलेल्या खाजगी रुग्णालयात झालेला असावा.
  • तसेच मुलीचे शिक्षण राज्य सरकारच्या शाळेत झालेले असणे आवश्यक आहे.
  • मुलीच्या पालकाकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

Mukhyamantri Rajashri Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “मुख्यमंत्री राजश्री योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहेत?

  • मुलीच्या पालकांचे आधार कार्ड
  • प्रसूती दरम्यान आईचा मृत्यू झाल्यास मृत्यू प्रमाणपत्र
  • मुलीचे आधार कार्ड
  • जन्म प्रमाणपत्र
  • ममता कार्ड
  • आरोग्य कार्ड
  • दोन अपत्य असल्यास स्वयंघोषणपत्र
  • शाळा प्रवेशाचा दाखला
  • मोबाईल नंबर
  • बँक खात्याचा तपशील
  • पासपोर्ट साईज आकाराचे फोटो

Mukhyamantri Rajashri Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया

● ऑफलाइन अर्ज पद्धत

  • Mukhyamantri Rajashri Yojana 2024 (मुख्यमंत्री राजश्री योजना 2024) च्या माध्यमातून लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारास ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत.
  • त्यासाठी तुम्हाला सरकारी दवाखान्यात जावे लागणार आहे.
  • त्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री राजश्री योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • आता तुम्हाला अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक आणि अचूकपद्धतीने भरावी लागेल.
  • तसेच त्यासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडावी लागतील.
  • आणि त्यानंतर भरलेला अर्ज तुम्हाला संबंधित कार्यालयात जमा करावा लागणार आहे.
  • अशा पद्धतीने मित्रांनो, तुमची Mukhyamantri Rajashri Yojana 2024 (मुख्यमंत्री राजश्री योजना 2024) ची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हाला “मुख्यमंत्री राजश्री योजना 2024” ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४आंतरजातीय विवाह योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४लेक लाडकी योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024
वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना 2024
विद्याधन स्कॉलरशिप योजना 2024पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना 2024
महामेष योजना 2024मध केंद्र योजना 2024
महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2024
गोदाम अनुदान योजना 2024छत्रपती शिवाजी महाराज कर्ज मुक्ती योजना 2024
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना 2024आयुष्मान भारत विमा योजना 2024
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 2024महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024
थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजना 2024
Mukhyamantri Rajashri Yojana 2024:FAQ’s
Mukhyamantri Rajashri Yojana 2024 (मुख्यमंत्री राजश्री योजना 2024) ची सुरुवात कोणी आणि कधी केली?

मुख्यमंत्री राजश्री योजना 2024 ची सुरुवात राजस्थान सरकारने 1 जून 2016 रोजी केली.

Mukhyamantri Rajashri Yojana 2024 (मुख्यमंत्री राजश्री योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?

राज्यातील मुलींचा सर्वांगीण विकास करणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.

Mukhyamantri Rajashri Yojana 2024 (मुख्यमंत्री राजश्री योजना 2024) चे लाभार्थी कोण आहेत?

मुख्यमंत्री राजश्री योजना 2024 च्या माध्यमातून राजस्थान राज्यातील मुली लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.

Mukhyamantri Rajashri Yojana 2024 (मुख्यमंत्री राजश्री योजना 2024) च्या माध्यमातून काय लाभ मिळणार आहे?

मुख्यमंत्री राजश्री योजना 2024 च्या माध्यमातून राज्यातील मुलींना शिक्षणासाठी 50,000/- रुपये आर्थिक सहाय्य केले जाणार आहे.

Mukhyamantri Rajashri Yojana 2024 (मुख्यमंत्री राजश्री योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?

मुख्यमंत्री राजश्री योजना 2024 चा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.