Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024: उच्चशिक्षणासाठी OBC विद्यार्थ्यांना दरवर्षी 60,000/- रुपये मिळणार!!

Table of Contents

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana In Marathi 2024

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024 (ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024 च्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी शासनामार्फत दरवर्षी 60,000/- रुपये मिळणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया ही योजना कोणी सुरू केली? काय आहेत या योजनेची वैशिष्ट्ये? या योजनेचे उद्देश काय आहे? या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोण कोण पात्र असणार आहे? त्याचबरोबर कोणती कोणती कागदपत्रे लागणार आहेत? या योजनेचा अर्ज कशाप्रकारे करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खाली दिलेली सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचा.

मित्रांनो, केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपल्या देशातील तसेच राज्यातील विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना सातत्याने राबवत असते. जसे की, विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना जेणेकरून आपल्या राज्यातील विद्यार्थी मित्रांना उच्च शिक्षण घेता यावे, राज्यातील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल व्हावे. त्याचप्रमाणे आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास व्हावा. अशीच एक योजना आपल्या केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र येऊन सुरू केलेली आहे, ती म्हणजेच Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024 (ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024) होय.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024 अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेता यावे, त्यांना आर्थिक पाठबळ मिळावे, तसेच त्यांचा आर्थिक विकास व्हावा, त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, त्यांचे भविष्य उज्वल करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू करण्याचा अतीशय महत्वाचा निर्णय घेतला आहे.

मित्रांनो, या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्चशिक्षणासाठी सरकार मार्फत 60 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. या आर्थिक मदतीमुळे आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थी आपल्या शैक्षणिक गरजा पूर्ण करू शकतील. आर्थिक कमजोरीमुळे बहुतांश विद्यार्थी इच्छा असून देखील उच्चशिक्षण घेऊ शकत नाहीत. त्यांना उच्चशिक्षण घेण्यासाठी बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश मिळाला नाही तसेच ज्या विद्यार्थी मित्रांची आर्थिकस्थिती कमजोर आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना अतीशय महत्वाची योजना आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024 च्या माध्यमातून प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.

आपल्याला माहितीच आहे की, महाराष्ट्र सरकार आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच त्यांच्या उज्वल भविष्यासाठी, त्याचबरोबर त्यांच्या कल्याणासाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असते. त्याचप्रकारे Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024 (ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024) योजना राबविण्याचा सरकारने अतीशय योग्य निर्णय घेतला आहे. मित्रांनो, तुम्ही जर महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी असाल आणि विशेष म्हणजे उच्चशिक्षण घेण्यासाठी इच्छुक असाल त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे ओबीसी प्रवर्गातील असाल तर, तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकताय. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकताय

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024:थोडक्यात माहिती

योजनेचे नावDnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024
(ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024)
राज्यमहाराष्ट्र राज्य
योजना कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
योजनेचे उद्देशमहाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे
योजनेचे लाभार्थीउच्चशिक्षण घेण्यासाठी इच्छुक असणारे महाराष्ट्र राज्यातील ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभउच्चशिक्षणासाठी दरवर्षी 60,000/- रुपये आर्थिक सहाय्य मिळणार
योजनेची अर्ज प्रक्रियाऑफलाइन
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024: योजनेचे उद्देश

चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024” चे उद्देश काय काय आहेत?

  • Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024 (ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024) ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली अतीशय महत्वाची योजना आहे.
  • या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील ओबीसी प्रवर्गातील उच्चशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करणे.
  • महाराष्ट्र राज्यातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहात तसेच महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही त्यांना आर्थिक सहाय्य करणे.
  • महाराष्ट्र राज्यातील ओबकी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी दरवर्षी 60,000/- रुपये आर्थिक सहाय्य करणे.
  • राज्यातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या उद्देशाने Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024 (ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024) ची सुरुवात करण्यात आली आहे.
  • त्याचबरोबर राज्यातील विद्यार्थ्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणे.
  • राज्यातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेण्यासाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये.
  • महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024:योजनेची वैशिष्ट्ये

चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024” ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?

  • ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024 ही राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी सुरू केलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी आर्थिक मदत मिळणार आहे, जेणेकरून त्यांना शिक्षणासाठी कुठल्याही समस्यांचा सामना करावा लागणार नाही.
  • महाराष्ट्र राज्यातील एकूण 21,600 विद्यार्थ्यांना त्यामध्ये प्रति जिल्हा 600 विद्यार्थ्यांचा समावेश आहे, त्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024 चा लाभ देण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
  • ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024 च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास होणार आहे.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थी सशक्त व आत्मनिर्भर होतील.
  • उच्चशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर कोणाकडून कर्ज घेण्याची वेळ येणार नाही.
  • या योजनेमुळे राज्यातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास देखील होणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून मिळणारी लाभाची रक्कम ही विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात डीबीटीच्या सहाय्याने जमा करण्यात येणार आहे.
  • ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024 ची अर्ज प्रक्रिया अतीशय सोपी ठेवण्यात आली आहे, त्यामुळे सदर योजनेचा अर्ज करताना अर्जदार विद्यार्थ्याला कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागणार नाही.
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024: पात्रता, अटी व शर्ती

चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024” चा लाभ घेण्यासाठी काय काय पात्रता असणे आवश्यक आहे? काय काय अटी व शर्ती आहेत?

  • ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024 चा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील विद्यार्थी असल्यास या योजनेसाठी त्यांना अर्ज करता येणार नाही, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • सदर योजनेचा अर्ज फक्त महाराष्ट्र राज्यातील ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थीच करू शकतात.
  • अर्जदाराकडे जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार अपंग श्रेणीत असल्यास त्यांच्याकडे जिल्हा शल्यचिकित्सकाकडून मिळालेले 40 टक्के पेक्षा जास्त अपंगत्वाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • त्याचप्रमाणे अर्जदार विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे.
  • अर्जदार विद्यार्थी जर शिक्षण घेण्यासाठी दुसऱ्या शहरात किंवा वसतिगृहात तसेच भाड्याच्या खोलीत राहत असले तर ते देखील या योजनेचा लाभ मिळवू शकतात.
  • महत्वाचं म्हणजे अर्जदार विद्यार्थ्याचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे बंधनकारक आहे.
  • अर्जदार अनाथ असल्यास त्यांनी महिला व बालकल्याण विभागाच्या सक्षम अधिकाऱ्याकडून अनाथ असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे

चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला
  • रेशन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • 10 वी व 12 वी मार्कशीट
  • शाळा तसेच महाविद्यालयाचा प्रवेश घेतल्याचा पुरावा
  • मोबाईल नंबर
  • बँक खात्याचा तपशील
  • पासपोर्ट साईज आकाराचे फोटो

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?

● ऑफलाइन अर्ज पद्धत :-

  • Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024 (ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024) चा अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्व प्रथम आपल्या जवळील समाज कल्याण विभाग कार्यालयात जायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला कार्यालयातून “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024” चा अर्ज घ्यावा लागेल.
  • सदर योजनेचा अर्ज घेतल्यानंतर तुम्हाला अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक आणि अचूकपणे भरावी लागेल.
  • अर्जात संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून झाल्यानंतर त्यासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडावी लागतील.
  • अर्ज पुन्हा एकदा तपासून घ्यावा, त्यामध्ये संपूर्ण माहिती योग्य आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे.
  • आता तुम्ही भरलेला अर्ज संबंधित कार्यालयात जमा करू शकताय.
  • मित्रांनो, त्यानंतर तुमच्या अर्जाची संपूर्ण तपासणी केली जाईल,आणि तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य केले जाईल.
  • अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुमची “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024” ची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हालाज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024 ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४मोफत शिलाई मशीन योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४बीज भांडवल योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024
दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024आंतरजातीय विवाह योजना 2024
पीक कर्ज योजना 2024डिझेल पंप सबसिडी योजना 2024
चंदन कन्या योजना 2024इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2024
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024गाय गोठा अनुदान योजना 2024
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024जिव्हाळा कर्ज योजना 2024
डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजना 2024अपंग बस सवलत योजना 2024
एकात्मिक ग्रामीण विकास योजना 2024सुभद्रा योजना 2024
प्रधानमंत्री मुद्रा योजना 2024प्रधानमंत्री सूर्य घर योजना 2024
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024:FAQ’s
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024 (ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024) ही कोणी सुरू केली?

सदर योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे.

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024 (ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024) चे उद्देश काय आहे?

महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024 चा कोणाला लाभ मिळणार आहे?

उच्चशिक्षण घेण्यासाठी इच्छुक असणारे महाराष्ट्र राज्यातील ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024 (ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024) च्या माध्यमातून काय लाभ मिळणार आहे?

या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी दरवर्षी 60,000/- रुपये आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024 चा अर्ज कसा करायचा आहे?

सदर योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.