Khavati Anudan Yojana 2024:महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबांना मिळणार आर्थिक सहाय्य!!

Khavati Anudan Yojana In Marathi 2024

Khavati Anudan Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या राज्यातील आदिवासी कुटुंबांच्या कल्याणासाठी सुरू केलेल्या अतीशय महत्वाच्या योजनेची सविस्तर माहिती आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत. जसे की, काय आहे ही योजना? या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय काय पात्रता आवश्यक आहे. राज्यातील कोणत्या नागरिकांना या योजनेचा लाभ लाभ दिला जाणार आहे? महत्वाचं म्हणजे कोण या योजनेसाठी पात्र ठरणार आहे? या योजनेचे उद्देश आणि वैशिष्ट्ये काय काय आहेत? या योजनेचा अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती असणार आहेत? काय आहेत या योजनेचे फायदे? या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आम्ही खालील लेखात दिली आहे. मित्रांनो, तुम्हाला जर खरोखर या योजनेच्या लाभ घ्यायचा असेल तर संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.

मित्रांनो, राज्य सरकार आपल्या राज्याच्या विकासासाठी तसेच राज्यातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन योजना घेऊन येत असते. त्याचबरोबर आपल्या राज्यातील आदिवासी बांधवांसाठी देखील राज्य सरकार नवनवीन योजना राबवत असते, जेणेकरून आदिवासी बांधवांचा आर्थिक विकास व्हावा, त्यांचे भविष्य उज्वल व्हावे, त्याचबरोबर त्यांचे जीवनमान सुधारावे. त्यातीलच एक योजना राज्य सरकारने सुरू केली आहे ती म्हणजे Khavati Anudan Yojana 2024 (खावटी अनुदान योजना 2024) होय.

Khavati Anudan Yojana 2024 (खावटी अनुदान योजना 2024) ही प्रामुख्याने आपली राज्यातील दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत असलेले आदिवासी कुटुंब यांच्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की राज्यातील ग्रामीण भागात रोजगाराचे साधन उपलब्ध नसते त्यामुळे आदिवासी कुटुंबांची आर्थिक स्थिती ही कमजोर असते. अशी कुटुंबे आपल्या दैनंदिन गरजा देखील पूर्ण करू शकत नसतात. तसेच अशी कुटुंबे आपला उदरनिर्वाह करण्यासाठी हाताला मिळेल ते काम करतात.

जून ते सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे ग्रामीण भागात कोणत्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध नसतो. या पावसाच्या महिन्यांमध्ये उत्पन्नाचे कोणतेही साधन उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते. परिणामी त्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. या सर्व समस्यांचा काळजीपूर्वक विचार करून महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या राज्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी Khavati Anudan Yojana 2024 (खावटी अनुदान योजना 2024) योजना सुरू करण्याचा अतीशय महत्वाचा असा निर्णय घेतला आहे.

आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या आदिवासी कुटुंबांना कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण येऊ नये, त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये तसेच त्यांना आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये, या उद्देशाने Khavati Anudan Yojana 2024 (खावटी अनुदान योजना 2024) सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील आदिवासी कुटुंबांना आपल्या उदरनिर्वाहासाठी प्रतिवर्ष 4 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येते.

मित्रांनो, खावटी अनुदान योजना 2024 साठी राज्य सरकारकडून 486 कोटी रुपयांचे बजेट निर्धारित करण्यात आले आहे. महत्वाचं म्हणजे या योजनेअंतर्गत आपल्या राज्यातील 11.55 लाख आदिवासी त्याचबरोबर अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य करण्यात येते.

Khavati Anudan Yojana 2024

खावटी अनुदान योजना 2024:थोडक्यात माहिती

योजनेचे नावKhavati Anudan Yojana 2024
(खावटी अनुदान योजना 2024)
योजना कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
योजना कधी सुरू केली1978
राज्यमहाराष्ट्र राज्य
विभागसमाज कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य
योजनेचे लाभार्थीराज्यातील आदिवासी व अनुसूचित जमातीतील कुटुंबे
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभ4,000/- रुपये आर्थिक सहाय
योजनेचे मुख्य उद्देशराज्यातील आर्थिकदृष्ट्या कमजोर कुटुंबांना आर्थिक सहाय्य करणे
अर्ज करण्याची प्रक्रियाऑफलाइन
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

Khavati Anudan Yojana 2024: योजनेचे उद्देश

मित्रांनो, जाणून घेऊया Khavati Anudan Yojana 2024 (खावटी अनुदान योजना 2024) चे उद्देश काय आहे?

  • महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असलेल्या आदिवासी कुटुंबाकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन उपलब्ध नसते. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या महिन्यांमध्ये म्हणजेच जून ते सप्टेंबर महिन्यात त्यांना कोणताही रोजगार उपलब्ध होत नाही. अशा कुटुंबावर पावसाळ्याच्या महिन्यांमध्ये उपासमारीची वेळ येऊ नये त्याचबरोबर त्यांना कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू नये या उद्देशाने Khavati Anudan Yojana 2024 (खावटी अनुदान योजना 2024) सुरू करण्यात आली आहे.

Khavati Anudan Yojana 2024:योजनेची वैशिष्ट्ये

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “खावटी अनुदान योजना 2024” ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?

  • राज्यातील दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असलेल्या आदिवासी कुटुंबांचा आर्थिक विकास करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत ही योजना राबवण्यात आली आहे.
  • महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळास निधी उपलब्ध करून दिला जातो.
  • या पूर्वीच्या काळात खावटी अनुदान योजने अंतर्गत 50 टक्के रक्कम ही वस्तुरूपात आणि 50 टक्के रक्कम ही रोख स्वरूपात दिली जात होती, आता मात्र सरकारच्या नवीन नियमानुसार 100 टक्के रोख रक्कम देण्यात येणार आहे.
  • या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम ही लाभार्थी कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यात थेट डीबीटी च्या सहाय्याने जमा करण्यात येते.
  • जर लाभार्थी कुटुंबातील महिलेच्या बँक खाते नसेल तर आशावेळी शासनाकडून संबंधित महिलेचे बँक खाते उघडून दिले जाते.
  • सदर योजनेअंतर्गत 11 लाख 55 हजार कुटुंबांना लाभ देण्याचे लक्ष आहे.
  • त्यासाठी अंदाजे 486 कोटी रुपयांचे बजेट निर्धारित केले गेले आहे.
  • राज्यातील काही दुर्गम भागात बँक उपलब्ध नसते अशावेळी त्याठिकाणी लाभाची रक्कम ही पोस्टाद्वारे पाठवली जाते.

Khavati Anudan Yojana 2024:योजनेचे लाभार्थी

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “खावटी अनुदान योजना 2024” चे लाभार्थी कोण कोण आहेत?

  • माडिया वर्गातील कुटुंबे
  • आदिम जमातीची सर्व कुटुंबे
  • मनरेगा मध्ये एक दिवस कार्यरत असलेले आदिवासी मजूर
  • भूमिहीन शेतमजूर
  • आदिवासी कुटुंबे
  • पारधी जमातीतील कुटुंबे
  • घटस्फोटीत महिला
  • विधवा महिला
  • कोलाम वर्गातील कुटुंबे
  • अपंग व्यक्तीचे कुटुंब
  • कातकरी वर्गातील कुटुंबे
  • अनाथ मुलांचा सांभाळ करणारे कुटुंब

Khavati Anudan Yojana 2024:योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या वस्तु

  • साखर
  • उडीद डाळ
  • चवळी
  • मटकी
  • चहा पावडर
  • तूर डाळ
  • मीठ
  • हरभरा
  • वाटाणा
  • शेंगदाणा तेल
  • गरम मसाला
  • मिरची पावडर

Khavati Anudan Yojana 2024:अनुदान

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “खावटी अनुदान योजना 2024” च्या माध्यमातून किती अनुदान देण्यात येणार आहे?

  • Khavati Anudan Yojana 2024 (खावटी अनुदान योजना 2024) च्या माध्यमातून राज्यातील दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असलेले आदिवासी कुटुंबांना प्रतिवर्ष 4 हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.
Khavati Anudan Yojana 2024

Khavati Anudan Yojana 2024:पात्रता, अटी व शर्ती

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “खावटी अनुदान योजना 2024” साठी काय काय पात्रता आवश्यक आहे? काय काय अटीव शर्ती आहेत?

  • सदर योजेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • फक्त महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील आदिवासी कुटुंबांना खावटी अनुदान योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील कुटुंबांना खावटी अनुदान योजनेचा अर्ज करता येणार नाही, त्यांना या योजनेच्या माध्यमातून कोणताही लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती जर सरकारी नोकरीमध्ये कार्यरत असेल तर अशा कुटुंबांना या योजनेच्या माध्यमातून दिला जाणार नाही.
  • या पूर्वीच्या काळात जर अर्जदार कुटुंबाने राज्य व केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून अनुदान मिळविले असले तर अशावेळी त्यांना या योजनेचा अर्ज करता येणार नाही.
  • महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्य रेषेखालील आर्थिक दृष्ट्या गरीब आदिवासी कुटुंबांनाच खावटी अनुदान योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
  • अर्जदार व्यक्तीकडे जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
  • त्याचबरोबर अर्जदार व्यक्तीकडे तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील फक्त ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या आदिवासी कुटुंबांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Khavati Anudan Yojana 2024:आवश्यक कागदपत्रे

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “खावटी अनुदान योजना 2024″चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

  • अर्जदार व्यक्तीचे आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • जातीचा दाखला
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • अर्जदार व्यक्ती अपंग असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र
  • अर्जदार महिला विधवा असले तर पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
  • अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र
  • अर्जदार महिला घटस्फोटीत असल्यास न्यायालयीन आदेश

Khavati Anudan Yojana 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “खावटी अनुदान योजना 2024″चा अर्ज कसा करायचा आहे?

● ऑफलाइन अर्ज पद्धत :- शहरी भागासाठी

  • शहरी भागातील अर्जदारास सर्वप्रथम आपल्या जवळील नगरपालिका, नगरक्षेत्र किंबव आदिवासी विकास योजना कार्यालयात जावे लागणार आहे.
  • त्यानंतर तेथील कर्मचाऱ्याकडून सदर योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्ज घेतल्यानंतर त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून त्यासोबत आवश्यक आसणारी सर्व कागदपत्रे जोडायची आहेत.
  • त्यानंतर भरलेला अर्ज संबंधित कार्यालयात जमा करावा लागेल.

● ऑफलाइन अर्ज पद्धत :- ग्रामीण भागासाठी

  • ग्रामीण भागातील अर्जदारास सर्वप्रथम आपल्या गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयात जावे लागेल. तिथून ग्रामसेवक, तलाठी किंवा आदिवासी विकास विभागातील कर्मचाऱ्यांकडून खावटी अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्ज घेतल्यानंतर त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक अचूकपणे भरायची आहे.
  • संपूर्ण माहिती भरल्यानंतर त्यासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडायची आहेत.
  • आणि शेवटी अर्ज संबंधित कार्यालयात जमा करायचा आहे.
  • अशा प्रकारे मित्रांनो, तुमची खावटी अनुदान योजना 2024 ची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हालाखावटी अनुदान योजना 2024 ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 मोफत शिलाई मशीन योजना 2024
मोदी आवास घरकुल योजना 2024बीज भांडवल योजना 2024
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024गाय गोठा अनुदान योजना 2024
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४डिझेल पंप सबसिडी योजना 2024
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४ इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2024
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024
इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना 2024श्रावण बाळ योजना 2024
जिव्हाळा कर्ज योजना 2024ताडपत्री अनुदान योजना 2024
किशोरी शक्ती योजना 2024विलासराव देशमुख अभय योजना 2024
हर घर नल योजना 2024मल्चिंग पेपर योजना 2024
अपंग पेन्शन योजना 2024कन्या वन समृद्धी योजना 2024
Khavati Anudan Yojana 2024:FAQ’s
Khavati Anudan Yojana 2024 (खावटी अनुदान योजना 2024) कोणी आणि कधी सुरू केली?

सदर योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारने 1978 साली सुरू केली आहे.

Khavati Anudan Yojana 2024 (खावटी अनुदान योजना 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?

राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमजोर आदिवासी कुटुंबांना आर्थिक सहाय्य करणे हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.

Khavati Anudan Yojana 2024 (खावटी अनुदान योजना 2024) च्या माध्यमातून किती लाभ मिळणार आहे?

खावटी अनुदान योजनेच्या माध्यमातून पात्र कुटुंबांना प्रतिवर्ष 4 हजार रुपये आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

Khavati Anudan Yojana 2024 (खावटी अनुदान योजना 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?

खावटी अनुदान योजना 2024 चा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.