Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024: शेतकऱ्यांना मुलीच्या लग्नासाठी मिळणार आर्थिक सहाय्य!

Table of Contents

Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024 In Marathi

Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024: नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या या लेखात Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024 (सामूहिक विवाह योजना महाराष्ट्र 2024) ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेअंतर्गत आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी सरकार आर्थिक सहाय्य करणार आहे.

चला तर मग या योजनेची संपूर्ण माहिती जसे की, ही योजना कोणी सुरू केली? या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतो? काय आहेत या योजनेच्या अटी व शर्ती? काय काय फायदे या योजनेच्या माध्यमातून होणार आहेत? या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? या योजनेचा अर्ज करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे? ई संपूर्ण माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास खालील संपूर्ण लेख काळजीपूर्वक वाचा आणि आपल्या गरजू मित्र-मैत्रिणींना शेअर करा.

महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील नागरिकांच्या उज्वल भविष्याचा काळजीपूर्वक विचार करून सतत नवनवीन योजना सुरू करत असते. त्याचबरोबर आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी देखील राज्य सरकार प्रयत्नशील असते. जेणेकरून आपल्या जगाच्या पोशिंद्याला कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये, शेतकरी बांधवांचा आर्थिक आणि सामाजिक विकास व्हावा. अशीच एक योजना आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या मुलींसाठी राज्य सरकारने सुरू केली आहे, ती म्हणजे Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024 (सामूहिक विवाह योजना महाराष्ट्र 2024) होय.

मित्रांनो, आपला भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक शेती हा व्यवसाय करत असतात. शेती व मजुरी करून ग्रामीण भागातील नागरिक आपला उदरनिर्वाह करतात. बहुतांश शेतकऱ्यांची आर्थिकस्थिती ही कमजोर असते, त्यामुळे त्यांना आपल्या मुलीचे लग्न करणे शक्य नसते, त्यांना लग्नाचा खर्च परवडणारा नसतो. शेतकरी इतर कोणाकडून कर्ज काढून आपल्या मुलीचे लग्न करतो, परंतु शेवटी जास्त व्याजदर असल्यामुळे शेतकऱ्याला कर्ज फेडणे अशक्य होते. अशावेळी शेतकऱ्यांना अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो.

शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांचा काळजीपूर्वक विचार करून राज्य सरकारने Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024 (सामूहिक विवाह योजना महाराष्ट्र 2024) सुरू करण्याचा अतीशय महत्वाचा असा निर्णय घेतला आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आपल्या मुलीच्या लग्नासाठी इतर कोणाकडून जास्त व्याजदराने कर्ज काढण्याची गरज भासणार नाही. सामूहिक विवाह योजना महाराष्ट्र 2024 च्या माध्यमातून शासनामार्फत शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नाच्या वेळी 25 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या शेतकऱ्यांच्या तसेच शेतमजुरांच्या मुलींना लग्नासाठी आर्थिक सहाय्य करणे, हे Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024 (सामूहिक विवाह योजना महाराष्ट्र 2024) चे मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या माध्यमातून विविध समाज तसेच सर्व धर्माच्या चालीरीती व रूढी-परंपरेनुसार सामूहिक विवाह आयोजित केले जातात.

Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024

सामूहिक विवाह योजना महाराष्ट्र 2024:थोडक्यात माहिती पाहूया

योजनेचे नावSamuhik Vivah Yojana Maharashtra 2024
(सामूहिक विवाह योजना महाराष्ट्र 2024)
योजना कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
राज्यमहाराष्ट्र राज्य
योजनेचे मुख्य उद्देशराज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकरी/ शेतमजुरांच्या मुलींच्या लग्नासाठी आर्थिक सहाय्य करणे
योजनेचे लाभार्थीराज्यातील शेतकरी/शेतमजुरांच्या मुली
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभ25 हजार रुपये आर्थिक सहाय्य
अर्ज करण्याची प्रक्रियाऑफलाइन
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️
सामूहिक विवाह योजना महाराष्ट्र 2024 शासन निर्णय➡️येथे पहा GR⬅️

Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024:योजनेचे मुख्य उद्देश

चला तर मग, जाणून घेऊया Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024 (सामूहिक विवाह योजना महाराष्ट्र 2024) चे उद्देश काय काय आहेत?

  • महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकरी/शेतमजूर/मजूर यांच्या मुलींच्या लग्नासाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024 (सामूहिक विवाह योजना महाराष्ट्र 2024) सुरू केली आहे.
  • शेतकऱ्यांना आपल्या मुलीच्या लग्नाच्या खर्चासाठी इतर कोणाकडून जास्त व्याजदराने कर्ज काढण्याची वेळ येऊ नये, हे देखील या योजनेचे मुख्य उद्देश आहे.

Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024:योजनेची वैशिष्ट्ये

चला तर मग, जाणून घेऊया सामूहिक विवाह योजना महाराष्ट्र 2024 ची वैशिष्ट्ये काय काय आहेत?

  • Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024 (सामूहिक विवाह योजना महाराष्ट्र 2024) ही महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राज्यातील शेतकरी/शेतमजूर/मजूर यांच्या मुलीच्या सामूहिक विवाहासाठी सुरू करण्यात आलेली अतीशय महत्वाची योजना आहे.
  • सदर योजना ही जिल्हा नियोजन विकास समिती (DPDC) मार्फत राबविण्यात येते.
  • सामूहिक विवाह योजना महाराष्ट्र 2024 च्या माध्यमातून दिली जाणारी लाभाची रक्कम ही लाभार्थी असलेल्या व्यक्तीच्या बँक खात्यात थेट डीबीटीच्या सहाय्याने जमा करण्यात येते.
  • सदर योजनेची अर्ज प्रक्रिया अतीशय सोपी ठेवण्यात आली आहे, त्यामुळे या योजनेचा अर्ज करतेवेळी अर्जदारास कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागणार नाही.
  • एखाद्या जोडप्याने सामूहिक विवाह सोहळ्यात सामील न होता सरळ विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन विवाह करतील अशावेळी त्या जोडप्यांना शासनामार्फत 10 हजार रुपये अनुदान देण्यात येईल.

Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024:लाभार्थी

चला तर मग, जाणून घेऊया सामूहिक विवाह योजना महाराष्ट्र 2024 चे लाभार्थी कोण कोण आहेत?

  • महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकरी /शेतमजुरांच्या मुली सामूहिक विवाह योजनेचा अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024:योजनेचे फायदे

चला तर मग, जाणून घेऊया सामूहिक विवाह योजना महाराष्ट्र 2024 चे फायदे काय काय आहेत?

  • महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात आलेल्या सामूहिक विवाह योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकरी बांधवांच्या मुलीच्या लग्नासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तु खरेदी करण्यासाठी 25,000/- रुपये अनुदान देण्यात येते.
  • त्याचबरोबर सामूहिक विवाह आयोजित करणाऱ्या संस्थेला समारंभाचा खर्च भागवण्यासाठी 2,000/- रुपयांचे अनुदान देण्यात येते.
  • त्याचप्रमाणे लग्नाच्यावेळी आवश्यक असणारे मंगळसूत्र आणि इतर आवश्यक वस्तु खरेदीसाठी देखील मदत केली जाते.
  • आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना लग्न समारंभ आणि विवाह नोंदणीसाठी मदत केली जाते.
  • लग्नपत्रिका छापण्यासाठी मदत केली जाते.
  • तसेच इतर समाजिक कार्यक्रमासाठी मदत करण्यात येते.
  • स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन अनुदान दिले जाते.
Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024

Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024:पात्रता

चला तर मग, जाणून घेऊया सामूहिक विवाह योजना महाराष्ट्र 2024 साठी काय काय पात्रता आवश्यक आहे?

  • सदर योजनेचा अर्ज करू इच्छिणारा अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • त्याचप्रमाणे अर्जदार व्यक्ती ही शेतकरी कुटुंबातील असणे आवश्यक आहे.

Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024:अटी व शर्ती

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय काय अटी व शर्ती आहेत?

  • सामूहिक विवाह योजना महाराष्ट्र 2024 चा लाभ हा महाराष्ट्र राज्यातील केवळ आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलींनाच दिला जाणार आहे.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील मुलींना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • कुटुंबातील केवळ पहिला विवाह असल्यास या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
  • सदर योजनेचा अर्ज करणारी अर्जदार मुलगी ही शेतकरी /शेतमजूर कुटुंबातील असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न हे 2 लाखापेक्षा जास्त नसावे.
  • त्याचबरोबर या योजनेमार्फत सामाजिक विभागाचे आयोजन करणाऱ्या संस्था नोंदणीकृत असणे आवश्यक राहील.
  • महत्वाचं म्हणजे विवाह दिनांकाच्या दिवशी वधुचे वय 18 वर्ष पूर्ण आणि वराचे वय 21 वर्षे पूर्ण असणे अनिवार्य आहे.
  • जर वधू वर पुनर्विवाह करत असतील तर अशावेळी त्यांना या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जाणार नाही, परंतु वधू घटस्फोटीत /विधवा असेल तर अशावेळी तिच्या पुनर्विवाहासाठी या योजनेच्या माध्यमातून अनुदान दिले जाईल.
  • या योजनेसाठी अनुसूचित जाती -जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, विशेष मागास प्रवर्ग या वर्गातील मुली आपत्र असतील, कारण त्यांच्यासाठी सामूहिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि आदिवासी विकास विभाग अंतर्गत स्वतंत्र योजना राबवली जाते.

Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024:आवश्यक कागदपत्रे

चला तर मग, जाणून घेऊया सामूहिक विवाह योजना महाराष्ट्र 2024 चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

  • वधू-वराचे आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • जन्म नोंदणी प्रमाणपत्र/ शाळेचा दाखला (जमनाच्या पुराव्यासाठी)
  • पालकांच्या बँक खात्याचा तपशील
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून शेतीचा 7/12 उतारा
  • लग्नाचे प्रमाणपत्र
  • बाल विवाह प्रतिबंधक कायदा आणि हुंडा प्रतिबंधक कायद्याचा भंग न केल्याचे प्रतिज्ञापत्र

Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मग, जाणून घेऊया सामूहिक विवाह योजना महाराष्ट्र 2024 चा अर्ज कसा करायचा आहे?

● ऑफलाइन अर्ज पद्धत :-

  • अर्जदारास सर्वप्रथम आपल्या जवळील महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयात जावे लागणार आहे.
  • त्यानंतर संबधित कार्यालयातून सामूहिक विवाह योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • आता तुम्हाला घेतलेल्या अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरायची आहे.
  • संपूर्ण माहिती भरल्यानंतर आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
  • आता तुम्हाला भरलेला अर्ज पुन्हा एकदा तपासून घ्यायचा आहे, भरलेली माहिती अचूक आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज संबंधित कार्यालयात जमा करावा लागणार आहे.
  • अशा प्रकारे मित्रांनो, तुमची सामूहिक विवाह योजना महाराष्ट्र 2024 ची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हालासामूहिक विवाह योजना महाराष्ट्र 2024 ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 मोफत शिलाई मशीन योजना 2024
मोदी आवास घरकुल योजना 2024बीज भांडवल योजना 2024
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024गाय गोठा अनुदान योजना 2024
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४डिझेल पंप सबसिडी योजना 2024
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४ इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2024
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024
इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना 2024श्रावण बाळ योजना 2024
जिव्हाळा कर्ज योजना 2024ताडपत्री अनुदान योजना 2024
किशोरी शक्ती योजना 2024विलासराव देशमुख अभय योजना 2024
नवीन स्वर्णिमा योजना 2024बांधकाम कामगार योजना 2024
अपंग पेन्शन योजना 2024कन्या वन समृद्धी योजना 2024
आत्मनिर्भर भारत रोजगार योजना 2024बाल संगोपन योजना 2024
Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024:FAQ’s
Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024 (सामूहिक विवाह योजना महाराष्ट्र 2024) ची सुरुवात कोणी केली ?

सामूहिक विवाह योजनेची सुरुवात महाराष्ट्र राज्य सरकारने केली आहे.

Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024 (सामूहिक विवाह योजना महाराष्ट्र 2024) चे मुख्य उद्देश काय आहे?

राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकरी/ शेतमजुरांच्या मुलींच्या लग्नासाठी आर्थिक सहाय्य करणे हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.

Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024 (सामूहिक विवाह योजना महाराष्ट्र 2024) चा लाभ कोण घेऊ शकतो?

सदर योजनेचा लाभ हा महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकरी/शेतमजूर/ मजूर यांच्या मुली घेऊ शकतात.

Samuhik Vivah Yojana Maharashtra 2024 (सामूहिक विवाह योजना महाराष्ट्र 2024) चा अर्ज कसा करायचा आहे?

सदर योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.