Garodar Mata Yojana Marathi 2024:महाराष्ट्र शासनामार्फत गरोदर महिलांना मिळणार 6 हजार रुपये!!

Table of Contents

Garodar Mata Yojana In Marathi 2024

Garodar Mata Yojana Marathi 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2024 ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील गर्भवती व स्तनपान कालावधीत असलेल्या महिलांना वेतन नुकसान भरपाई म्हणून आर्थिक सहाय्य मिळणार आहे. चला तर मग नक्की काय आहे ही योजना? कोण कोण या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवू शकतो? काय आहेत या योजनेच्या अटी व शर्ती? या योजनेच्या माध्यमातून महिलांना किती आर्थिक सहाय्य मिळणार आहे? या योजनेचे फायदे काय काय आहेत? या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे लागणार आहेत? या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? ई संपूर्ण माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत.

मित्रांनो, केंद्र व राज्य सरकार आपल्या राज्यातील व देशातील महिलांसाठी सतत नवनवीन योजना राबवत असते, जेणेकरून आपल्या राज्यातील महिलांचा आर्थिक आणि सामाजिक विकास व्हावा, त्यांना त्यांच्या पायावर उभे रहाता यावे, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. त्यातीलच एक योजना म्हणजे “इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2024” होय. ही योजना ‘Garodar Mata Yojana‘ म्हणून देखील ओळखली जाते. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गर्भवती व स्तनपान कालावधीत असलेल्या महिलांना वेतन नुकसान भरपाई म्हणून राज्य सरकार मार्फत 6 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

Garodar Mata Yojana Marathi 2024 (गरोदर माता योजना 2024) च्या माध्यमातून मिळणारी ही आर्थिक मदत तीन हफ्त्यांमध्ये केली जाते. पहिल्या टप्प्यामध्ये 2,000/- रुपये गरोदरपणाचे 6 महीने पूर्ण झाल्यानंतर गरोदर मातेच्या बँक खात्यात जमा केले जातील (पोस्ट बँक खाते असणे आवश्यक आहे). त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये 2,000/- रुपये रक्कम बाळाच्या जन्माच्या 3 महिन्यानंतर बाळाचे लसीकरण व नियमित स्तनपान होण्याच्या अटीवर बाल विकास प्रकल्प अधिकारी अंगणवाडी सेविके मार्फत गरोदर मातेच्या बँक खात्यात जमा करण्यात येतील. इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2024 अंतर्गत तिसऱ्या टप्प्यामध्ये 1,000/- रुपये बाळाच्या जन्माच्या 6 महिन्यानंतर नियमितपणे स्तपान व लसीकरणाच्या अटीवर बाल विकास प्रकल्प अधिकारी अंगणवाडी सेविके मार्फत गरोदर मातेच्या बँक खात्यात जमा करण्यात येतील.

मित्रांनो, केंद्र शासनाने एकात्मिक बाळ विकास सेवा योजनेअंतर्गत गर्भवती व स्तनपान कालावधीत असलेल्या महिलांना वेतन नुकसान भरपाई म्हणून आर्थिक सहाय्य करणे व अशा महिलांना पोषक आहार उपलब्ध करून देणे या उद्देशाने “इंदिरा गांधी मातृत्व सहयोगी योजना 2024” ची सुरुवात करण्यात आली आहे.

मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की, आपल्या महाराष्ट्र राज्यात ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या कुटुंबातील महिला गरोदर असून देखील शेतात काम करतात, त्यामुळे त्यांचे वजन वाढत नाही. प्रसूती नंतर त्यांच्या शरीरात ताकद नसताना देखील त्या पुन्हा आपल्या शेतात काम करतात. या कालावधीमध्ये त्यांना विश्रांतीची गरज असते, त्यांना पोषक आहार देणे गरजेचे असते. परंतु त्यांना आर्थिकदृष्ट्या गरीब असल्यामुळे शेतात काम करावेच लागते, त्यामुळे त्यांच्या शरीराला पुरेसा आराम मिळत नाही. या सर्व गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करून राज्यातील गर्भवती व स्तनपान कालावधीत असलेल्या महिलांना वेतन नुकसान भरपाई करून देण्यासाठी Garodar Mata Yojana (इंदिरा गांधी मातृत्व सहयोगी योजना 2024) सुरू करण्यात आली आहे.

मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील गर्भवती व स्तनपान कालावधीत असलेल्या महिलांना वेतन नुकसान भरपाई म्हणून आर्थिक सहाय्य मिळणार आहे. आता त्यांना गर्भवती व स्तनपान कालावधीत कामे करण्याची गरज भासणार नाही, त्यांना या योजनेच्या माध्यमातून भरपूर फायदा होणार आहे. त्याचबरोबर त्यांना या योजनेच्या माध्यमातून गर्भवती व स्तनपान कालावधीत त्यांच्या व बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी पोषक आहार देखील उपलब्ध होणार आहे.

Garodar Mata Yojana Marathi 2024

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2024:थोडक्यात माहिती

योजनेचे नावइंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना महाराष्ट्र
योजना कोणाद्वारे सुरू करण्यात आलीमहाराष्ट्र राज्य सरकारद्वारे सुरू करण्यात आली आहे
योजनेची सुरुवात कधी झाली2010
या योजनेचे उद्देश कायराज्यातील गर्भवती व स्तनपान कालावधीत असलेल्या महिलांना वेतन नुकसान भरपाई म्हणून आर्थिक सहाय्य करणे
योजनेचे लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील गर्भवती व स्तनपान कालावधीत असलेल्या महिला
योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभगर्भवती व स्तनपान कालावधीत असलेल्या महिलांना वेतन नुकसान भरपाई म्हणून आर्थिक सहाय्य मिळणार
योजनेची अर्ज करण्याची प्रक्रियाऑफलाइन
इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना (GR)➡️येथे क्लिक करा⬅️
अधिकृत वेबसाइट➡️येथे क्लिक करा⬅️

Garodar Mata Yojana Marathi 2024: योजनेचे उद्देश

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया ” इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2024″ चे उद्देश काय आहे?

  • या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्र राज्यातील गर्भवती व स्तनपान कालावधीत असलेल्या महिलांना वेतन नुकसान भरपाई म्हणून आर्थिक सहाय्य करणे.
  • महाराष्ट्र राज्यातील गर्भवती व स्तनपान कालावधीत असलेल्या महिलांचा आर्थिक विकास व्हावा, हे या योजनेचे उद्देश आहे.
  • गर्भवती व स्तनपान कालावधीत असलेल्या महिलांना बुडीत मजुरीची नुकसान भरपाई म्हणून आर्थिक सहाय्य करणे.
  • महत्वाचं म्हणजे गर्भवती व स्तनपान कालावधीत असलेल्या महिलांना इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये व इतर कोणाकडून पैसे उधार घेण्याची वेळ येऊ नये.
  • महाराष्ट्र राज्यातील गर्भवती व स्तनपान कालावधीत असलेल्या महिलांचे जीवनमान सुधारण्यास मदत करणे.

Garodar Mata Yojana Marathi 2024:योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभ

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2024” च्या माध्यमातून मिळणारा लाभ काय काय आहे?

  • Garodar Mata Yojana Marathi 2024 (गरोदर माता योजना 2024) च्या माध्यमातून 3 टप्प्यांमध्ये आर्थिक सहाय्य केले जाणार आहे.
  • पहिल्या टप्प्यामध्ये 2,000/- रुपये गरोदरपणाचे 6 महीने पूर्ण झाल्यानंतर गरोदर मातेच्या बँक खात्यात जमा केले जातील.(पोस्ट बँक खाते असणे आवश्यक आहे.)
  • त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये 2,000/- रुपये रक्कम बाळाच्या जन्माच्या 3 महिन्यानंतर बाळाचे लसीकरण व नियमित स्तनपान होण्याच्या अटीवर बाल विकास प्रकल्प अधिकारी अंगणवाडी सेविके मार्फत गरोदर मातेच्या बँक खात्यात जमा करण्यात येतील.
  • इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2024 अंतर्गत तिसऱ्या टप्प्यामध्ये 1,000/- रुपये बाळाच्या जन्माच्या 6 महिन्यानंतर नियमितपणे स्तपान व लसीकरणाच्या अटीवर बाल विकास प्रकल्प अधिकारी अंगणवाडी सेविके मार्फत गरोदर मातेच्या बँक खात्यात जमा करण्यात येतील.

Garodar Mata Yojana Marathi 2024:लाभार्थी

  • इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2024 चा लाभ महाराष्ट्र राज्यातील गर्भवती व स्तनपान कालावधीत असलेल्या महिलांना होणार आहे.

Garodar Mata Yojana Marathi 2024:पात्रता, अटी व शर्ती

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2024” साठी कोण कोण पात्र आहे? काय काय अटी व शर्ती आहेत?

  • Garodar Mata Yojana Marathi 2024 (गरोदर माता योजना 2024) चा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील गर्भवती असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिला ही गर्भवती असणे आवश्यक आहे.
  • इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2024 अंतर्गत मिळणाऱ्या लाभाची रक्कम मिळवण्यासाठी अर्जदार महिलेचे बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार महिलेचे बँक खाते नसल्यास कुटुंबातील इतर कोणाच्या खात्यावर ही लाभाची रक्कम जमा केली जाणार नाही.
  • त्याचबरोबर सरकारी व सार्वजनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांना सहवेतन मातृत्व रजा मिळत असल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
Garodar Mata Yojana Marathi 2024

Garodar Mata Yojana Marathi 2024:योजनेचे फायदे

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “गरोदर माता योजना 2024” चे काय काय फायदे आहेत?

  • गरोदर माता योजना 2024 च्या माध्यमातून राज्यातील गर्भवती महिलांना आर्थिक लाभ मिळाल्याने त्यांना गर्भावस्थेत काम करण्याची गरज नाही.
  • महाराष्ट्र राज्यातील गर्भवती व स्तनपान कालावधीत असलेल्या महिलांचे जीवनमान सुधारेल.
  • त्याचबरोबर गर्भवती व स्तनपान कालावधीत असलेल्या महिलांचे मानसिक आरोग्य सुधारेल.
  • राज्यातील महिलांचा आर्थिक विकास होईल.
  • महाराष्ट्र राज्यातील गर्भवती व स्तनपान कालावधीत असलेल्या महिलांना पोषक आहार घेणे शक्य होणार आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील गर्भवती व स्तनपान कालावधीत असलेल्या महिलांना इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.

Garodar Mata Yojana Marathi 2024:आवश्यक कागदपत्रे

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
  • बँक खात्याचा तपशील
  • प्रतिज्ञा पत्र

Garodar Mata Yojana Marathi 2024:अर्ज करण्याची प्रक्रिया

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया “इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2024” चा अर्ज कसा करायचा आहे?

● पद्धत 1

  • अर्जदार महिला गर्भावस्थेत ज्या आरोग्य केंद्रामध्ये तपासणी करणार असेल तिथल्या आरोग्य सेविकेमार्फत गर्भवती महिलांचा इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेसाठी अर्ज भरला जाईल. (अर्जदार महिलेकडे आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे.)

● पद्धत 2

  • अर्जदार गर्भवती महिलेने आपल्या जवळच्या क्षेत्रातील महिला व बाल विकास विभागामध्ये जाऊन इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेचा अर्ज घ्यावा.
  • अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक व्यवस्थित भरावी.
  • संपूर्ण माहिती भरल्यानंतर अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडावीत.
  • आणि त्यानंतर भरलेला अर्ज महिला व बाल विकास विभाग कार्यालयात जमा करावा.
  • अशा प्रकारे तुमची Garodar Mata Yojana Marathi 2024 (गरोदर माता योजना 2024) ची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

➡️इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2024 [GR]⬅️

सारांश

मित्रांनो, आम्ही तुम्हालाइंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2024 ची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की कशी आहे ही योजना, या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो, यासाठी काय काय लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजेच आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.

धन्यवाद !!

इतर काही सरकारी योजना तुम्ही पाहू शकताय ⤵️⤵️⤵️

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्ज योजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४
मोदी आवास घरकुल योजना 2024भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४
मोफत उच्चशिक्षण योजना २०२४मोफत शिलाई मशीन योजना 2024
शबरी घरकुल योजना २०२४बीज भांडवल योजना 2024
सुकन्या समृद्धी योजना 2024महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024
दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना 2024आंतरजातीय विवाह योजना 2024
पीक कर्ज योजना 2024डिझेल पंप सबसिडी योजना 2024
इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना 2024श्रावण बाळ योजना 2024
महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना 2024मोफत पिठाची गिरणी योजना 2024
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना 2024महाराष्ट्र नव तेजस्विनी योजना 2024
मध केंद्र योजना 2024महाडीबीटी बियाणे अनुदान योजना 2024
एकात्मिक ग्रामीण विकास योजना 2024प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 2024
प्रधानमंत्री आवास योजना 2024प्रधानमंत्री मुद्रा योजना 2024
Garodar Mata Yojana Marathi 2024:FAQ’s
Garodar Mata Yojana Marathi 2024 (गरोदर माता योजना 2024) कोणी सुरू केली आहे?

ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे.

या योजनेची सुरवात कधी करण्यात आली आहे?

या योजनेची सुरुवात 2010 ला करण्यात आली आहे.

Garodar Mata Yojana Marathi 2024 (गरोदर माता योजना 2024) चे उद्देश काय आहे?

राज्यातील गर्भवती व स्तनपान कालावधीत असलेल्या महिलांना वेतन नुकसान भरपाई म्हणून आर्थिक सहाय्य करणे.

या योजनेच्या माध्यमातून कोणाला लाभ मिळणर आहे?

महाराष्ट्र राज्यातील गर्भवती व स्तनपान कालावधीत असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2024 चा अर्ज कसा करायचा आहे?

या योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.